Wednesday, September 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : वाघाडीत 'एमडी'चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ड्रग्ज...

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ड्रग्ज जप्त, संशयित पसार

१०० ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत;

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) जप्त केले. पोलिसांची (Police) चाहूल लागताच कारवाईपूर्वीच संशयित पसार झाला. रवी राजू भालेराव (रा. वाल्मीक नगर, सैलानी बाबा चौकाजवळ, वाघाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी भालेराव हा त्याच्या राहत्या घरात विक्रीच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगत असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दुपारी २.४० ते सायंकाळी ६.१५ या कालावधीत भालेरावच्या घरावर छापा टाकला.घरझडतीदरम्यान फिकट तपकिरी रंगाचा, उग्र वास असलेला स्फटिकजन्य पदार्थ पोलिसांना आढळून आला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकातील सहायक केमिकल ॲनालायझर साक्षी कुऱ्हाडे आणि सायंटिफिक असिस्टंट यश जुनेजा यांनी प्राथमिक तपासणी केली.सदर पदार्थ मॅफेड्रॉन (एमडी) असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केल्यानंतर एकूण १०० ग्रॅम एमडी आढळून आले. त्याची अंदाजे बाजारपेठेतील किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुद्देमाल सीलबंद; संशयिताचा शोध सुरू

पोलिसांनी जप्त केलेले एमडी (MD) तसेच पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या पारदर्शक व काळ्या रंगाच्या पिशव्या फॉरेन्सिक नियमानुसार सीलबंद केल्या आहेत. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच संशयित रवी भालेराव पसार झाला.अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार भारत गेणू डंबाळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके पुढील तपास करीत असून संशयिताचा शोध सुरू आहे.पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ताजणे, देवकिसन गायकर, पोलिस हवालदार भारत डंबाळे, पोलिस अंमलदार गणेश वडजे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, महिला पोलिस अंमलदार अर्चना भड तसेच पोलिस हवालदार कैलास शिंदे, पोलिस अंमलदार नितीन जगताप व सचिन बाहीकर यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

ताज्या बातम्या

भीमनवार

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं पेपरफुटीवर पहिल्यांदाच भाष्य, खुलं पत्र लिहित...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (Drug Inspector) पदभरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना आणि राजीनाम्याच्या...