Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : विल्हाेळीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

Nashik Crime News : विल्हाेळीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नांदगाव (Nandgaon) येथे राहणाऱ्या तरुणाच्या डाेक्यात दगड टाकून खून (Murder) केल्याचे समाेर आले असून त्याचा मृतदेह (Dead Body) इंदिरानगर पाेलिसांच्या हद्दीतील विल्हाेळी कचरा डेपाेजवळील मैदानात आढळला आहे. प्रेमप्रकरणातून किंवा काहीतरी वादातून अज्ञातांनी हा खून केल्याचे समाेर आले असून, मारेकऱ्यांच्या शाेधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बत्तासे (वय ३१, रा. नांदगाव, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी(दि. ८) रात्री इंदिरानगर पोलीसांच्या (Indiranagar Police) हद्दीतील खत प्रकल्पासमोरील बाजूस युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पांडवलेणीच्या मागच्या बाजूस असलेल्या खतप्रकल्पा समोरील निर्जन ठिकाणी हा खून का व कुणी केला याबाबत अजूनही पुरेशी माहिती समाेर आली नसली तरी प्रेम प्रकरणातून अथवा घरगुती वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हे देखील वाचा :  Nashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना मिळणार ओळखपत्र

दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचनेने तपास सुरु आहे. दोन दिवसांपासून योगेश सुभाष बत्तासे हा मिसिंग असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी नांदगांव पोलिस ठाण्यात (Nandgaon Police Station) नोंद केल्याचे समजत असून एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. इंदिरानगर पोलिस अधीक तपास करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...