Sunday, October 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : नाशिकरोड बसस्थानकातून दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; गुन्हे शाखेची...

Nashik Crime News : नाशिकरोड बसस्थानकातून दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांची चौकशी

जेलरोड | वार्ताहर | Jailraod

नाशिकरोड बसस्थानक परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी संबंधित व्यक्तींची ओळख, भारतात येण्याचा उद्देश तसेच त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या वास्तव्याबाबत आणि भारतात प्रवेश करण्यासंदर्भातील कागदपत्रांचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे नाशिकरोड बसस्थानक परिसरात चर्चेला उधाण आले होते.गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...