Friday, August 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'ती' फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road Area) एका बिल्डराचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या अलाइनमेंटशी संबंधित हे प्रकरण असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

संबंधित नगरसेवक नाशिकरोड विभागाचे असतांना गंगापूर रोड परिसरातील प्रकरणासाठी त्यांनी नगररचना विभागात पाठपुरावा का केला. त्यामुळे या फाईलचे स्वरूप आणि त्यातील हितसंबंध काय, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुक्रवारी (दि. १२) मनपाच्या नगररचना विभागात झालेल्या वादानंतर कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल करत स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे.

त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठक लांबणीवर

याप्रकरणी सोमवारी (दि. १५) महापालिका आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी दोघांना समोरासमोर बसवून चर्चा करण्याचे संकेत दिले होते. मात्र दिवसभर ही बैठकच न झाल्याने प्रकरणातील अनिश्चितता कायम राहिली आहे. सोमवारी शहरात शाळा प्रवेशोत्सव, महासभा तसेच अन्य प्रशासकीय कार्यक्र मां मध्ये आयुक्त व्यस्त होत्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी...