Thursday, September 10, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कॉलेज रोड ते जुने नाशिकपर्यंत टवाळखोरांची धरपकड; भरलेले...

Nashik Crime News : कॉलेज रोड ते जुने नाशिकपर्यंत टवाळखोरांची धरपकड; भरलेले ग्लास आणि पॅग टाकून मद्यपींचा पळ

​एरिया टार्गेट करून थेट झाडाझडती

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलिसांनी गुन्हेगारी (Nashik City Police) आणि टवाळखोरीला चाप लावण्यासाठी ‘विशिष्ट एरिया टार्गेट’ करत शुक्रवारी (दि. १०) रात्री ८:३० ते १ वाजेच्या सुमारास अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईमुळे मद्यपि, टवाळखोर आणि हिस्ट्रीशिटर्सची चांगलीच पळापळ झाली. विशेषतः कॉलेज रोड आणि जुने नाशिक भागात पोलिसांनी एकाच वेळी वेढा टाकल्याने अनेकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. 

- Advertisement -

​सिव्हील ड्रेसमधील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार समोर येताच, उघड्यावर आणि आडोशाला ‘ओपन बार’ मांडून बसलेल्या मद्यपींचे धाबे दणाणले. अनेक ठिकाणी मद्यपींनी भरलेले ग्लास आणि पॅग तसेच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी (Police) त्यांचा पाठलाग केला आणि दंडुक्यांचा ‘प्रसाद’ देत थेट पोलीस ठाण्याची वाट दाखवली. या कारवाईदरम्यान उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या काही सामान्य नागरिकांचीही चौकशी करण्यात आली, मात्र खातरजमा करून त्यांना योग्य समज देऊन सोडण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने उपायुक्त मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

भद्रकाली परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने जुने नाशिक, बागवानपुरा, कोकणीपुरा, नानावली, शिरीषकुमार चाैक, द्वारका, भीमवाडी अशा संवेदनशील भागात पेट्रोलिंग करून विनाकारण फिरणाऱ्या ७० संशयितांवर कारवाई केली. दुसरीकडे, गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत कॉलेज रोड, महात्मा नगर आणि आनंदवली भागात वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे व सुरेश आव्हाड यांच्या पथकांनी ११० जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर बीपी ऍक्ट ११२, ११७ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्रीच्या वेळी शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणारे, आडाेसा शाेधून मद्यप्राशन करणारे व कट्ट्यांवर बसून हुल्लडबाजी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अशाच स्वरुपात पोलिसांची हे ‘सरप्राइज चेकिंग’ सातत्याने सुरूच राहणार आहे, असे पाेलिस आयुक्तालयाने सांगितले. 

मुद्दे

पोलिसांनी कॉलेज रोड आणि जुने नाशिक या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करून नाकेबंदी केली.
सिव्हील ड्रेसमधील पोलिसांना पाहताच ‘ओपन बार’ चालवणाऱ्या मद्यपींनी भरलेले ग्लास फेकून पळ काढला.
​पळणाऱ्या मद्यपींचा पोलिसांनी पाठलाग केला, चोप दिला आणि पोलीस गाडीत बसवून थेट ठाण्यात हजेरी घेतली.
​गंगापूर हद्दीत ११० तर भद्रकाली हद्दीत ७० हून अधिक टवाळखोरांवर कायदेशीर कारवाईचा बडगा
गंगापूरला बेकायदेशीर सायलेन्सर वापरणाऱ्या ७ बुलेट चालकांवर आणि २५ ट्रिपल सीट वाहनांवर दंडात्मक कारवाई.
झोन १ मधील सर्व पोलीस ठाण्यांचे डीबी पथक आणि क्राईम स्टाफ रस्त्यावर

ताज्या बातम्या

default-featured-image

Eknath Shinde : लंडनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून...

0
नवी दिल्ली | New Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिटनच्या संसदेत आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नागरिक-केंद्री, पारदर्शक...