Sunday, October 4, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु, मिळणार...

Ashok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु, मिळणार कठाेर शिक्षा!

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्रोपचारांचा बनाव रचून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईने आता महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एका बाजूला खरातविरुद्ध दाखल खटल्यात (Kharat Case) दोषनिश्चितीचा (चार्ज फ्रेम) टप्पा सुरू झाल्याने त्याला लवकरच न्यायालयीन शिक्षेच्या चौकटीत आणण्याची शक्यता बळावली आहे, तर दुसऱ्या बाजूला विविध गुन्ह्यांतील तपासासाठी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) त्याचा ताबा घेतला जात असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

विशेष तपास पथकाकडे (‘एसआयटी’) असलेल्या गुन्ह्यांपैकी मुख्य प्रकरणात आता दोषनिश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानुसार न्यायालयात सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष या दोघांचाही दोषारोपांतील मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि वकील परिमल फळे हे बाजू मांडत आहेत. १७ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या पहिल्या प्रकरणात पोलिसांनी (Police) तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, या पुराव्यांच्या आधारे खरातला कठाेर शिक्षेकडे नेण्यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयात किल्ला लढवला आहे.

राज्य पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्च २०२६ पासून पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती आणि किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासह २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एसआयटी पथक खरातच्या ११ गुन्ह्यांचा कसून तपास करत आहे. खरातविरुद्ध दाखल एकूण १८ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे हे थेट अत्याचाराचे असून, उर्वरित गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धा विरोधी कायदा (Law) आणि सावकारी अधिनियमांतर्गत आहेत. ‘एसआयटी’व्यतिरिक्त नाशिक शहर, अहिल्यानगर आणि नाशिक ग्रामीण पोलिसांकडे असलेल्या उर्वरित गुन्ह्यांचा तपासही वेगाने सुरू आहे.

​उद्या कोर्टात हजेरी

नेवासा (Newasa) येथील एका व्यापाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी २७ मार्च रोजी दाखल गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी खरातला कारागृहातून ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मिळालेल्या पोलिस कोठडीत तीन दिवसांनंतर पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. ही वाढीव कोठडी संपत असल्याने खरातला उद्या (दि. ५) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नाशिक शहर पोलिसांकडे (Nashik City Police) असलेल्या इतरही गुन्ह्यांत तपासासाठी खरातची कोठडी मागितली जाण्याची दाट शक्यता असल्याने भोंदूचा कोठडीतील मुक्काम लांबणार असल्याचे स्पष्ट दिसते.

ताज्या बातम्या

‘सोमेश्वर’ कारखान्यात ‘अजितदादां’च्या नावावरून महासंग्राम! सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचे जशास...

0
बारामती । Baramati बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या 'श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या' निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत...