Saturday, October 5, 2024
Homeक्राईमNashik Crime News : धनवटे खून प्रकरणात व्यंकटेशवर अंगुलीनिर्देश

Nashik Crime News : धनवटे खून प्रकरणात व्यंकटेशवर अंगुलीनिर्देश

संशयितांची जबाबात माहिती

नाशिक | Nashik

सफाई कर्मचारी आकाश धनवटे याच्या खुनातील (Murder) चारही संशयित मारेकऱ्यांचे जबाब सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) नोंदवले आहेत. त्यात भाजपचा (BJP) माथाडी सेलचा नाशिक शहराध्यक्ष संशयित व्यंकटेश मोरे याने हा खून करण्यास दबाव आणल्याचे मारेकऱ्यांनी सांगितल्याचे समोर येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून व्यंकटेश पसार असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘छोटी भाभी’ एमडी प्रकरण; बेकायदेशीर वसुली उजेडात

पंडित कॉलनीत सफाई कर्मचारी आकाश धनवटे (Akash Dhanwate) याच्यावर मंगळवारी (दि.१) सकाळी सहा वाजेच्या सुमारास बारा वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याचा भाऊ मकरंद ऊर्फ सोमा संतोष धनवटे (रा. घारपुरे घाट) याने फिर्याद दिली. त्यानुसार व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख, अथर्व दाते, अक्षय तरे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा संशयित अथर्व, अक्षय व अल्पवयीन मुलासह मकरंदला ताब्यात घेतले. या तिघांनाही ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयितांच्या (Suspect) जबाबानुसार, व्यंकटेशचा दबाव होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यासंदर्भात पोलीस पडताळणी करत असून व्यंकटेशच्या मागावर पथके रवाना केली आहेत.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह

मोरे हा सोशल मीडियावर अपडेट असून पोस्ट अपलोड करत आहे. तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दलही त्याने पोस्ट अपलोड केली आहे. त्यामुळे पोलीस त्याला शोधण्यात मागे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु गंभीर गुन्ह्यात जामिनावर असतानाही त्याची अटक करण्यात काय अडथळे येत आहेत, अशीही चर्चा आहे. सोबतच मोरे ज्या लोकप्रतिनिधीच्या वरदहस्ताने काम करत होता त्यांचीही एमडी प्रकरणात विचारणा होण्याची दाट शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या