Saturday, November 14, 2026
HomeनाशिकNashik Crime News : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा...

Nashik Crime News : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा वडि‍लांचा आरोप

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

शहापूर तालुक्यातील (Shahapur Taluka) वंगणपाडा (खर्डी) येथे दामिनी संदीप सदगीर (वय २५) या विवाहित महिलेचा बुधवार (४ नोव्हेंबर) रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू आत्महत्या (Suicide) नसून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिचे वडील नामदेव भवानू कोकाटे (रा. शेणवड बु., ता. इगतपुरी) यांनी केला आहे. याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

१० लाख रुपये हुंड्यासाठी छळ

तक्रारीत नमूद केल्यानुसार, दामिनी हिचा विवाह २० मे २०२१ रोजी संदीप शंकर सदगीर याच्याशी करोना काळात अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला होता. मात्र, लग्नात खर्च कमी झाला असल्याचे कारण पुढे करत सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू झाली. पती वकील झाल्यानंतर तरी माहेरून १० लाख रुपये आणावेत, यासाठी दामिनीवर दबाव टाकून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता.पैसे न आणल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही वडिलांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या दामिनीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या, तसेच तिचा माहेरी संपर्क होऊ नये म्हणून तिचा मोबाईल फोडणे व नंबर ब्लॉक करण्याचे प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पतीचाही त्याच दिवशी मृत्यू; गूढ वाढले

४ नोव्हेंबर रोजी दामिनीच्या मृत्यूची माहिती मिळताच वडील (Father) घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दामिनीच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा आणि चेहऱ्यावर मारहाणीमुळे सूज दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दामिनीचा पती संदीप याचाही मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद असल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.

सासरच्या चार जणांविरुद्ध तक्रार

या प्रकरणी सासरे शंकर तुकाराम सदगीर, चुलत सासरे निवृत्ती तुकाराम सदगीर, दीर गणेश शंकर सदगीर आणि आत्येसासू सखुबाई बाबू बेनके यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वडील नामदेव कोकाटे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

चंद्रशेखर

एनडीएचे पार्टनर…सुनेत्रा पवार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं सुचक वक्तव्य; म्हणाले,...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच आज खासदार सुप्रीया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चांना पूर्ण विराम...