Saturday, November 14, 2026
HomeनाशिकNashik Crime News : इंदिरानगरात चोरट्यांचा शाही डल्ला! ​काजू, बदाम, अक्रोड अन्...

Nashik Crime News : इंदिरानगरात चोरट्यांचा शाही डल्ला! ​काजू, बदाम, अक्रोड अन् देशी तुपावर मारला ताव

द्वारकाधीश सुपर मार्केटमध्ये चाेरी

​नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दिवाळी (Diwali) संपल्यावरही ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत इंदिरानगर परिसरातील (Indiranagar) एका किराणा दुकानाला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी इतर साहित्यापेक्षा महागड्या सुकामेव्यावर आणि अस्सल देशी तुपाच्या डब्यांवर मोर्चा वळवत अगदी शाही अंदाजात हात साफ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, वडाळा पाथर्डी रोड येथील शिवालिक स्कायपार्क शेजारील बिझनेस अ‍्हेन्यू परिसात द्वारकाधीश किराणा सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. फिर्यादी महेंद्र विश्वनाथ बर्डे (वय ३६, रा. सुदर्शन कॉलनी, इंदिरानगर) यांचे हे दुकान आहे. १० ते ११ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर कशाच्या तरी सहाय्याने उचकटले. दुकानात आत प्रवेश करत चोरट्यांनी मौल्यवान साहित्याची चोरी केली.

दुकानदाराने (Shop) ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुकामेवा आणि खाद्यतेल भरून ठेवले होते. चोरट्यांनी नेमका हाच माल चोरट्यांच्या नजरेत आला व त्यांनी ६८ हजार रुपये किमतीचा सुकामेवा (काजू, बदाम, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता), तसेच मुरली व फॉर्च्यून कंपनीचे देशी व खाद्यतेलाचे १५ बॉक्सेस लांबवले. याशिवाय दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व हार्डडिस्क आणि गल्ल्यातील ११ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे.  

​सीसीटीव्हीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी केवळ मालावरच हात साफ केला नाही, तर पोलिसांच्या हाती पुरावा लागू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आणि हार्डडिस्क देखील सोबत नेली आहे. यामुळे चोरटे सराईत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. बर्डे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार पारणकर करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

पडसाद : नाशिकचा श्वास गुदमरतोय…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. पण अलीकडच्या काही वर्षांत या सणाचे स्वरूप बदलले आहे....