Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास; चोरट्यांकडून हत्याराने...

Nashik Crime News : दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास; चोरट्यांकडून हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न

ओझे । वार्ताहर | Oze

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ढकांबे येथे दरोडा टाकून मारहाण करुन सोन्याची पोती, कानातील सोन्याचे कुडके यांच्यासह काही रोख रक्कमेसह लंपास केला असून, आरोपी फरार झाले आहे. ढकांबे (Dhakambe) येथे काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास धात्रक कुटुंबियांच्या घरावर दरोडा टाकला.

यात घराच्या दरवाजाची आतील कडी तोडून आत प्रवेश करुन ताराबाई मनोहर धात्रक, सुरेश मनोहर धात्रक, मनोहर बारकु धात्रक यांना हत्याराने जीवे मारण्याचा धाक दाखवला. हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. परंतु कुटूंबियांना जबरी मार लागल्याने त्यांना नाशिकला (Nashik) एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी सत्तर हजार रुपयांचे दोेन सोन्याच्या मणी असलेल्या पोती प्रत्येक अंदाजे ५ ग्रॅम, दहा हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडके अंदाजे एक ग्रॅम यासह अडीच ते तीन लाखांची रोख रक्कम व ऐवज लंपास करण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) अज्ञातविराोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील अधिक तपास अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज खुळे करीत आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...