Sunday, October 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : राम रथ यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीत १० भाविकांचे...

Nashik Crime News : राम रथ यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीत १० भाविकांचे लाखो रुपयांचे दागिने लंपास

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी परिसरातील (Panchvati Area) कृष्णनगर येथे राम रथ यात्रेदरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० भाविकांना लक्ष्य करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आमदार बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तसेच रामरथ मार्गावर रविवारी सायंकाळी साडेसात ते मध्यरात्रीदरम्यान घडली. याबाबत सोमनाथ रामचंद्र खैरे (रा. द्वारका) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीतून (Crowd) मार्ग काढताना चोरट्यांनी अत्यंत चलाखीने खैरे यांची सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली. याशिवाय, त्यांच्या सोबत असलेल्या तसेच परिसरातील आणखी नऊ महिलांच्या मंगळसूत्रांतील सोन्याचे मणी व वाट्या देखील चोरट्यांनी हिसकावून घेतले. या घटनेत निकीता पाटील, लावण्या बिंदे, अरुणा पवार, निकीता निकम, मोनिका इंगळे, सुशिला मोंढे, रंजना भालेराव, संस्कृती साठे आणि जयश्री तराळ या महिलांचा समावेश असून, सर्वांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

दरम्यान, या सामूहिक चोरीमुळे भाविकांमध्ये (Devotees) भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी (Police) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार काळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! ‘बॉस’ची ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूरमधील गोळीबार प्रकरणातून (Satpur Firing Case) चर्चेत आलेल्या लोंढे टोळीच्या (Londhe Gang) न्यायालयीन लढाईला आता वेग आला आहे. टोळीचा म्होरक्या...