Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या

Nashik Crime : दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर जवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी रात्री नऊ ते दहा च्या सुमारास दोघा सख्ख्या भावांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून या घटनेनंतर आंबेडकर वाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आंबेडकर वाडीत मन्ना जाधव व त्याचा भाऊ प्रशांत जाधव हे राहत्या घरी असताना हल्लेखोर आले व त्यांनी दोघा भावावर सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दोघाही भावांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, हल्ला करणाऱ्यांची नावे पोलिसांना समजले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे समजते. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या हल्ल्यात ठार झालेले मन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...