Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : पिंपळगाव बसवंतहून चोरली दुचाकी; अवघ्या १२ तासात दुचाकीचोर...

Nashik Crime News : पिंपळगाव बसवंतहून चोरली दुचाकी; अवघ्या १२ तासात दुचाकीचोर ‘गुंग्या’ पोलिसांच्या ताब्यात

निफाड | प्रतिनिधी | Niphad

- Advertisement -

तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. बोटावर मोजण्या इतक्या चोरीच्या दुचाकी गेल्या दहा वर्षात सापडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्यापुढील काळात चोरी गेलेल्या दुचाकी अद्याप पोलिसांना सापडलेल्या नाहीत, हे वास्तव आहे…

मात्र, ९ मार्च २०२३ रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदाची धुरा ज्यांनी हाती घेतली. त्या अशोक पवार यांनी १७ सप्टेंबर रोजी मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्या. त्यामुळे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संपूर्ण गावांतील नागरिकांना आनंदाचे भरते आले आहे.

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा; भुजबळांचे निर्देश

याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी गुंग्या उर्फ प्रथमेश राजेंद्र केदारे (२१, रा. आंबेडकर नगर, राजवाडा, पिंपळगाव बसवंत) याने दुचाकी (क्र. एमएच १५ ईयु ९४०३) चोरी केली. यापूर्वी चोरी गेलेल्या दुचाकीच्या मालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केलेला नाही, असे समजते. पण, रविवारी (दि. १७) पहाटे दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित “गुंग्या”ला १२ तासांतच बेड्या ठोकण्यात आल्या.

जगदीश अर्जुन मोरे यांनी (३८, रा. बाजार गल्ली, मच्छि मार्केट शेजारी, वणी, ता. दिंडोरी) यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यामुळेच पिंपळगाव पोलिसांना संशयित दुचाकी चोराला बेड्या ठोकता आल्या.

विशेष म्हणजे चोरी केलेली दुचाकी देखील ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

New Parliament : नव्या संसदेचा आजपासून ‘श्रीगणेशा’, खासदारांना मिळणार खास गिफ्ट

यामुळे पिंपळगाव बसवंत पोलिसांना सध्या नागरिक सलाम करीत असून, आमच्याही चोरी गेलेल्या दुचाकी शोधून द्याव्यात, अशी अपेक्षा पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थांना आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कंत्राटी पदभरतीच्या विरोधात अधिकारी महासंघ आक्रमक

- Advertisment -

ताज्या बातम्या