Sunday, October 6, 2024
Homeक्राईमNashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले

Nashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले

शिरवाडे वाकद | Shirwade Vakad

भरवस फाटा-कोळपेवाडी (Bharvas Phata-Kolpewadi) राज्य मार्गावर (State Higway) आमच्या गाडीस कट का मारला अशी कुरापत काढून किर्तनकारास मारहाण (Beating) करून रोख १० हजार रुपये लुटल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दोन युवकांच्या (Youth) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

 हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

याबाबत किर्तनकार लक्ष्मण राजेंद्र व्हरे (वय ३०) धंदा-किर्तन करणे रा.निळखेडे ता.येवला (Yeola) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.५ ऑक्टोबर रोजी मी व पुंजाराम सुकदेव कदम रा.निळखेडे माझ्या मालकीची टाटा इंडिका कार क्र.एम.एच.१५ बी.एन.२९९९ हिने कानळद येथील माझी आत्या शिलाबाई सिताराम जाधव हिस भेटुन कोळपेवाडी ते भरवस फाटा रोडने (Road) दुपारी ४ वाजता निळखेडे ता.येवला येथे जात होतो.

हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे जड?

त्यावेळी आमच्या पाठीमागुन सफेद रंगाची स्कुटी गाडीवरील अक्षय मोहन कुऱ्हाडे, ऋतिक महेंद्र जामकर दोन्ही रा.मुखेड ता.येवला यांनी मला ‘स्कूटी गाडीला कट का मारला’ असे बोलल्याने मी गाडी (Bike) रस्त्याचे बाजुला घेऊन उभी केली. तेव्हा गाडीवरील दोघे खाली उतरले व मला शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. मला रक्तदाबाचा त्रास असल्याने घाबरून बेशुद्द झालो. यावेळी सहकारी पुंजाराम कदम यांनी मला स्थानिक लोकांचे मदतीने लासलगाव येथील खाजगी रुग्णलयात दाखल केले. उपचारानंतर मला शुद्द आली असता वरील आरोपींनी माझ्या खिशातील १० हजार रोख रुपये चोरी (Theif) करुन घेऊन गेल्याचे निदर्शनास आले.

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “पहिल्या यादीत मला उमेदवारी न दिल्यास…”; शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार खोसकरांचा काँग्रेसला इशारा

दरम्यान, या फिर्यादीवरून आरोपींच्या (Suspect) विरोधात भारतीय न्यायिक संहिता २०२३ ३०३(२), ११५(२),३५२,३५१(२),३५१(३), ३२४(४), ३२४(५), ३(५) नुसार लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) गुन्हा (Case) दखल झाला आहे. तर पुढील तपास सपोनि भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.किशोर लासुरकर करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या