Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पंचवटीत भालेराव, मोरे गँगची दहशत; कोयता अन् दगडाने...

Nashik Crime News : पंचवटीत भालेराव, मोरे गँगची दहशत; कोयता अन् दगडाने मारहाण करत लुटमारीचा प्रयत्न

मोक्कातील जय खरात मोकाटच?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी पोलीस ठाण्यासमाेरील (Panchvati Police Station) मायकाे दवाखाना, फुलेनगर, मुंजाबाबा चौक परिसरात भालेराव, महाले आणि मोरे गँगने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मकोका लागलेला सराईत गुन्हेगार (Criminal) जय संतोष खरात याने साथीदार जय उर्फ टिंगऱ्या मोरे व इतरांनी पेठ रोडवरील मरी माता मंदिराजवळ १७ ऑगस्टच्या रात्री १० वाजता तुफान राडा घालत परिसरात दहशत माजवली. पार्टीसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघा तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून, दगडाने मारहाण करलुटमारीचा प्रयत्न केला. 

- Advertisement -

हेमंत धोंडीराम मोरे (वय २१, रा. मुंजाोबा चौक, फुलेनगर) व त्याचा मित्र विकास देविदास निरभवणे हे दोघे दुचाकीवरून जात असताना, संशयित जय खरात, सोनू गांगुर्डे, जय मोरे उर्फ टिंगऱ्या आणि प्रविण शार्दूल यांनी त्यांना अडवले. “पार्टीसाठी पैसे दे” अशी मागणी करत संशयितांनी (Suspected) हेमंतचे खिसे तपासले. पैसे नसल्याचे सांगताच संशयित चिडले आणि त्यांनी हेमंत व त्याच्या मित्राला गाडीवरून खाली उतरवून हात व दगडाने बेदम मारहाण केली.

दरम्यान, स्थानिक ​नागरिक (Citizen) मदतीला धावताच संशयित जय खरात याने कमरेला खोचलेला धारदार कोयता हवेत फिरवत, “मी या परिसराचा भाई आहे,” असे ओरडून शिवीगाळ करत लोकांच्या मागे धाव घेतली. या दहशतीमुळे नागरिकांनी भीतीपोटी घरांचे दरवाजे बंद करून घेतले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​’मोक्का’नंतरही धाक नाही?

११ मार्च २०२३ रोजी फुलेनगरात प्रेम महाले व युवराज शेळके यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी संशयित विशाल भालेराव, विक्की वाघ, संदीप अहिरेंसोबत संशयित जय खरात (वय १९) याच्यावर मे २०२३ मध्ये ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

गुन्ह्यांची मालिका

या टोळीतील संशयितांवर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रांचा वापर यांसारखे ३२ हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. मोक्कासारखी कडक कारवाई झालेली असतानाही संशयित जामिनावर बाहेर येऊन उघडपणे कोयते आणि दगड घेऊन नागरिकांवर हल्ले करत आहेत. मायको दवाखाना ते मुंजाबाबा चौकादरम्यानच्या या वर्चस्ववादावर पोलीस ठोस कारवाई करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....