Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या; पत्नीसह मावसभाऊ अटकेत

Nashik Crime News : प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या; पत्नीसह मावसभाऊ अटकेत

कचरा डेपाेजवळील तरुणाच्या हत्येची उकल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विवाहबाह्य प्रेमसंबंधात (Love Affair) पती अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीचा मावसभाऊ असलेल्या प्रियकराकरवी पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. इंदिरानगर पोलिसांच्या (Indiranagar Police) हद्दीतील कचरा डेपाेजवळील निर्जन ठिकाणी नांदगाव येथील योगेश बत्तासे(वय ३२) या विवाहित तरुणाच्या डाेक्यात दगड टाकून निर्घृण खून (Murder) केल्याचा प्रकार (दि.९) उघड झाला हाेता. मृताची ओळख पटल्याने या खुनाचा उलगडा करण्यात काही तासांत पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political News : निवडणूक विधानसभेची, तयारी मनपाची

कोमल योगेश बत्ताशे (रा.पिंपरखेड, ता.नांदगाव) कृष्णा जयराम गाेराणे (रा. सिडकाे) अशी अटक (Arrested) केलेल्या संशयित प्रेमीयुगुलाचे नाव आहे. योगेश बत्ताशे याची पत्नी कोमल व याेगेशचा मावसभाऊ कृष्णा यांचे काही महिन्यांपासून चाेरीछुपे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही सिडकोत एकाच घरात भाडेतत्वावार राहत होते. ही बाब योगेशला समजली. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता.

हे देखील वाचा : Nashik Political : मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रिपदी पोहोचवणार; माजी नगरसेवक संजय बागूल यांचा विश्वास

योगेश बत्तासे याने पत्नी (Wife) आणि मावसभावाला समज दिली होती.याेगेशने समज दिल्याचा राग आल्याने दोघांनीही संगनमत करुन योगेशचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी कृष्णा गोराणे याने शुक्रवारी (दि.८) रात्री आठ वाजेच्या सुमारास खत प्रकल्पासमोरील बाजूस योगेश बत्ताशे यास बोलवून घेतले. दाेघांनी मद्यपान केले. त्यानंतर कृष्णाने योगेशच्या डोक्यात दगड घालून खून केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...