Thursday, May 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार

Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) विल्होळी परिसरात सोमवारी (दि.१३) तरुणाची कोयत्याने खांडोळी करुन निर्घृण खून करण्यात आला. या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सूरज सोळंकी असे या ४५ वर्षीय मृताचे (Death) नाव असून, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रेकॉर्डवरून त्यांची ओळख पटली आहे. नाशिक तालुका पोलिसांनी (Nashik Taluka Police) आता खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

सोमवारी (दि. १३) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास विल्होळी गावातील (Vilholi Village) एका कंपनीच्या रस्त्यावर ही घटना घडली होती. एका महिलेने आणि तिच्या पुरुष साथीदाराने सूरजवर भररस्त्यात कोयत्याने सपासप वार केले. डोक्यावर आणि मानेवर झालेल्या गंभीर जखमांमुळे सोळंकी रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केल्यानंतर सोळंकी यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हा खून कौटुंबिक कारणातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नाशिक तालुका पोलिसांची (Nashik Taluka Police) पथके संशयितांच्या मागावर आहेत. भररस्त्यात झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...