Monday, November 16, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गॅस जोडणीदरम्यान विनयभंग; इंदिरानगर परिसरातील संतापजनक घटना  

Nashik Crime News : गॅस जोडणीदरम्यान विनयभंग; इंदिरानगर परिसरातील संतापजनक घटना  

एमएनजीएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरी सुरक्षितता आणि सेवेसाठी येणारे कंत्राटी कामगारच सुरक्षिततेचा गैरफायदा घेत असल्याचा संतापजनक प्रकार इंदिरानगर परिसरात (Indira Nagar Area) उघडकीस आला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे काम करण्यासाठी आलेल्या एका अज्ञात कंत्राटी कामगाराने गॅस जोडणीचे काम सुरू असताना घरातील एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, त्याचा शाेघ सुरु आहे.

- Advertisement -

​इंदिरानगर पोलिसांच्या (Indiranagar Police) माहितीनुसार आणि फिर्यादीनुसार, ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास श्री रवीशंकर मार्ग येथील एका बिल्डिंगमध्ये घडली. फिर्यादी यांच्या बिल्डिंगमध्ये एमएनजीएल कंपनीचे गॅस कनेक्शन बसवण्यासाठी संबंधित संशयित कामगार आला होता. ​त्याने घरातील गॅस कनेक्शन बसवून झाल्यानंतर गॅस साफ करण्यासाठी विम लिक्विड’ ची मागणी करुन फिर्यादी तरुणीला आवाज दिला.  तरुणीने किचनमध्ये जाऊन लिक्विड दिल्यानंतर घरातील आजी बाजूला जाताच, कामगाराने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.  

तो तरुणीच्या (Youth) जवळ गेला आणि हात पकडून तिच्या कमरेजवळ हात लावून विनयभंग केला. घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ७४ नुसार गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार पाटील करत असून गॅस जोडणीसारख्या घरगुती कामासाठी येणाऱ्या व्यक्तींकडूनच महिला असुरक्षित होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित कंत्राटदारावर आणि संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्या

जितेंद्र

“बिलाला पाठिंबा देणे म्हणजेच थेट देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा…”, नताशा आव्हाडांच्या...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी काल एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये नताशा...