Tuesday, May 28, 2024
HomeनाशिकNashik Crime News : नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

Nashik Crime News : नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

नाशिक रोड |प्रतिनिधी |Nashik Road

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकाने आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्याने हातात काठ्या कोयते व लाकडी दांडुक्या घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार गोसावी वाडी येथे घडला आहे. तसेच या दगडफेकीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे…

- Advertisement -

याबाबतचे वृत्त असे की, येथील गोसावी वाडी परिसरात सोनाली रवींद्र पिंपळे या ज्या ठिकाणी राहतात त्या रस्त्यावरून गुड्ड्या गोसावी नावाचा युवक मोटरसायकल घेऊन जोरात जात होता. यावेळी सोनाली पिंपळे या गुड्ड्या गोसावी याला म्हणाल्या की, तु गाडी हळू चालव गल्लीत लहान मुले खेळत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पिंपळे यांच्या बोलण्याचा गोसावी याला राग आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या