Tuesday, March 11, 2025
Homeक्राईमNashik Crime : नाशिकरोड कारागृह छळछावणी; कैद्यावर चार दिवस अत्याचार

Nashik Crime : नाशिकरोड कारागृह छळछावणी; कैद्यावर चार दिवस अत्याचार

बीडपेक्षाही जास्त गुन्हेगारी फोफावली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) घडलेल्या एका घटनेने नाशिकमध्ये (Nashik) प्रचंड खळबळ उडाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात (Murder Case) न्यायालयीन कोठडीत असलेल्या २४ वर्षीय कैद्यास त्याच्या सर्कलमधील नऊ सराईत सहकैद्यांनी त्याचे हातपाय बांधून ठेवत तीन ते चार दिवस अनन्वित अत्याचार केले. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडित कैद्याने न्यायाधिशांसमोर अनन्वित छळाबाबत आपबिती कथन केली असता, न्यायालयाने (Court) गंभीर दखल घेत पीडित कैद्यास मालेगाव छावणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यास सांगितले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे बीडपेक्षाही जास्त गुन्हेगारी नाशिकरोड कारागृहात फोफावल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे.

- Advertisement -

सागर उर्फ पंकज बाजीराव चौधरी (वय २५, रा. नेर कुसुंबा, जि. धुळे) असे पीडित कैद्याचे नाव असून मागील आठ-नऊ दिवसांपूर्वी संशयित कैदी पॉल व त्याचे साथीदार वाघमारे (वॉचमन), दिनेश चव्हाण (वॉचमन), लाला (जबाबदार), मामा (कैदी), वाजिद, महाजन, अमोल आणि मोहन (कैदी) यांनी छळवणूक (Harassment) केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा गुन्हा मालेगाव छावणी पोलिसांनी दाखल करुन तपासासाठी नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग केला आहे. पीडित सागर याला सन २०२१ मध्ये जायखेडा येथे घडलेल्या एका खूनप्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने तो १४ ऑक्टोबर २०२१ पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे.

तसेच २५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ या कालावधीत तो तुरुंगात असताना, सर्कल नंबर चारमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये वाद झाले होते. त्यात, वरील सहकैद्यांनी सागरवर संशय घेऊन त्याला दवाखान्यातील स्वच्छतागृहाच्या बाजूला नेऊन त्याच्या दोन्ही हातपायांना बेडी ठोकली. तो त्याच अवस्थेत असतांना, येथे भेळभत्ता आणि जेवण वाटप करणारा पॉल नुकताच स्वच्छतागृहातून बाहेर आला. त्याने हात न धुताच सागरला भत्ता खाण्यास दिला. त्याने नकार देताच पॉल व इतरांनी त्याला जबर मारहाण (Beating) केली. तसेच बळजबरीने भत्ता खाऊ घातला. त्यानंतर पुन्हा दोन, तीन दिवस सागर हा सर्कलमध्ये असताना त्याची बेडी न काढता पुन्हा शिवीगाळ करुन हा प्रकार कुठेही सांगितला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.

दरम्यान, कारागृह अधिक्षक राउंडसाठी आले असता सागरने संशयित (Suspect) कैद्यांची (Prisoners) तक्रार केली. त्यानंतर परत त्यांनी खुन्नस ठेवून त्याला बाथरुमला जायचे असतानाही तासन्तास ताटकळत ठेवले. त्यामुळे त्याला तेथेच शौच करावी लागली व अधिक्षकांनीही दखल घेतली नाही, असे त्याने नमूद केले आहे. या गंभीर आरोपानंतर कारागृह महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक काय भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

गळा आवळला, डोके आपटले

सागरला लघुशंका येत असताना संशयितांनी त्याला बांधून ठेवत एक बादली दिली. त्यात लघुशंका होत नसल्याने त्याने बेडी सोडविण्याची विनंती केली असता त्यांनी बेडी सोडून थेट रिंगण करून जबर मारहाण केली. यानंतर, पॉल व वाघमारे यांनी सागरच्या गळ्याला रुमाल गुंडाळून ओढला व वाजीदने पायावर लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच डॉक्टरांकडे काम करणारा कैदी महाजन याने बेल्टने मारहाण केली. वेदना असह्य झाल्याने त्याने आरडाओरड केली असता, वाघमारे याने मान धरुन भिंतीवर आपटली. रक्त आल्याने त्यांनी त्याची सुटका केली. यानंतर सागरने जेलचे डॉ. माळी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मदत केली नाही.

कारागृह प्रशासन अनभिज्ञ

सागर तुरुंगात असल्याने त्याचे वडील त्याला दरमहा मनीऑर्डर पाठवत होते. त्यापैकी मागील तीन महिन्यांची साडेसात हजार रुपयांची मनीऑर्डर त्याच्या नावाने कोणीतरी सही करुन गायब केली आहे. या सर्वच जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व बाबी कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याचे सागरने फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तुरुंग अधिक्षकांसह प्रशासनाला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी अधिक माहिती घेतो, असे जुजबी उत्तर देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Shirdi Crime News: शिर्डी पुन्हा हादरली! मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या

0
शिर्डी | प्रतिनिधी शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने...