Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : 'राज्यपाल'चा १५ कोटींत व्यवहार; पाच कोटी रुपये गोठवले

Nashik Crime : ‘राज्यपाल’चा १५ कोटींत व्यवहार; पाच कोटी रुपये गोठवले

चेन्नईतील माजी खासदाराला हवे होते पद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चेन्नईतील शास्त्रज्ञ व अभियंता नरसिम्मा रेड्डीसह त्यांचे मामा माजी खासदार जी. प्रताप रेड्डी या दोघांपैकी एकाला राज्यपाल (Governor) बनविण्यासाठी नाशिकमधील (Nashik) महाठग निरंजन कुलकर्णी या संशयिताने पाच नव्हे तर तब्बल पंधरा कोटी रुपये उकळले होते. या रकमेपैकी नऊ कोटी रुपयांचे धनादेश नरसिम्मा यांनी कुलकर्णीचा संशय आल्याने बँकेतून थांबवले तर उर्वरित सर्व पैसे व मालमत्ता नाशिक पोलिसांनी गोठवली आहे. त्यामुळे कुलकर्णनि १५ कोटी रुपयांत राज्यपाल पदासाठीचा व्यवहार फिक्स करुनही आता त्याच्याकडे ठणठणाट असून, शिवाय हाती बेड्या पडल्या आहेत.

- Advertisement -

राज्यपालपद देण्यासाठी पाच कोटींची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी चेन्नईतील शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिल्याने नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन सुरेश कुलकर्णी (वय ४०, रा. गंधर्व नगरी, नाशिकरोड) याला अटक केली आहे. त्याला नाशिक न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘जर गव्हर्नर पदाचे काम मी केले नाही तर माझ्या नावावरील जमिनीचे खरेदी खत तुमच्या नावे करेल’, असा दावा कुलकर्णीने केला होता.

हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी

संशयित (Suspect) आश्वासन पूर्ण करीत नसल्याचे समजताच त्याच्या दाव्यानुसार पेंच व बोर व्याघ्र प्रकल्पांजवळील शासनाकडून लीजवर घेतलेल्या जागेसह नाशिकच्या चांदशीच्या जागेच्या दस्तांची नरसिम्मांनी तपासणी केली. हे कागदपत्रे बनावट असल्याचे समजल्यावर संशयिताला दिलेले नऊ कोटींच्या चेकचे व्यवहार थांबवले. पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्यावर त्याच्या वडिलांचे बँक खाते गोठवले. संशयिताने नागपुरातील वैश्विक सेवा फाऊंडेशनच्या नावे बँक खात्यात कोट्यवधी रुपये नरसिम्मांकडून घेतले होते. देणगी स्वरुपातील हे पैसे संशयिताने मागितल्यावर संस्थेने विरोध केला. त्यामुळे संस्थेच्या नावावर त्या रकमेतून जमीन खरेदी झाली. या जमिनीचेही व्यवहार पोलिसांनी (Police) थांबवले आहेत. ती शासनजमा होणार आहे.

तीन महिन्यांत व्यवहार

जानेवारी २०२४ मध्ये कामानिमित्त नरसिम्मा रेड्डी नाशिकमध्ये आले. दोन दिवस मुंबई नाक्याजवळील नामांकित हॉटेलात मुक्कामी होते. तिथे सैन्य दलातील निवृत्त अधिकारी मनोहर यांच्यामार्फत ओळख झालेला संशयित कुलकर्णी हा रेड्डींना भेटला. त्यावेळी रेड्डी म्हणाले, ‘माझे मामा जी प्रताप रेड्डी हे तीनवेळा तेलंगणा राज्याचे विधानसभेचे सदस्य होते. यासह तीनवेळा लोकसभेत खासदार होतेफ त्यावर कुलकर्णी म्हणाला, ङ्गतुमचे मामाजी प्रताप यांना मी कोणत्याही राज्याचे गव्हर्नर पद देईल. त्यासाठी पंधरा कोटी रुपये द्यावे लागेल, असे सांगून जाळ्यात ओढले.

हे देखील वाचा : Nashik Crime : साखळीचोराच्या कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला

पैशाने भरलेली बॅग दिली

नरसिम्मा चेन्नईत गेल्यावर कुलकर्णीने नेहमीच फोन करुन ‘प्रपोजल’ बाबत विचारले. कुलकर्णीला नरसिम्मा यांचा होकार मिळताच ७ फेब्रुवारी रोजी ते नाशिकच्या हॉटेलात आले. संशयिताने भेटीवेळी ‘टोकन’ स्वरुपात ५०-६० लाख रुपये मागितले. त्यावेळी स्वतःकडे असलेली ६० लाखांची रोख रक्कम नरसिम्मांनी संशयिताला दिली. १५ फेब्रुवारी रोजी कुलकर्णीने नरसिम्मांना फोन करुन मामांना पुढील महिन्यांत राज्यपाल पद मिळेल. उर्वरित चौदा कोटी ४० लाख वडील सुरेश कुलकर्णी यांच्यासह वैश्विक फाउंडेशनच्या खात्यावर जमा करा, असे सांगितले.

पॉइंटर्स

१) नागपुरातील एका डॉक्टरालाही पोलिसांनी घेतले ताब्यात
२) डॉ. दाढे याची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी
३) ४ कोटी ४८ लाख ९९ हजार ८७६ रुपये बँक खात्यांवर जमा
४) ९ कोटी रुपयांचे चेक दिले होते, पण रोखले
५) संशयिताच्या निवृत्त वडिलांचे बँक खाते पोलिसांनी गोठवले
६) नागपुरात वैश्विक सेवा फाउंडेशनच्या बँक खात्यावर पैसे वर्ग

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...