नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर (Satpur) येथील अशाेकनगर भागात (Ashok Nagar Area) एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि. २) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये (SSC Student) झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस सखाेल तपास करत हाेते. याबाबत सध्या आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. सातपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ताे अशोकनगर येथील हिरे गार्डन जवळील खाजगी क्लासेसमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण (Education) घेत हाेता. सायंकाळी पाच वाजता क्लास सुटल्यानंतर परिसरात यशराज व त्याचे मित्र गप्पा मारत असताना किरकोळ वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. तेव्हा यशराज अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याचा दावा क्लासेसच्या शिक्षकांनी केला आहे. ताे खाली कोसळल्यानंतर तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने हलवण्यात आले.
दरम्यान, यानंतर रात्री उशिराने त्याला तपासून मृत (Death) घोषित करण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर यशराजच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होणार आहे. दरम्यान या घटनेनंतर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उघडकीस आला आहे. यासह अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये होणारा संघर्ष आणि वाढती गुन्हेगारी हा मुद्दादेखिल चर्चिला जात आहे.




