Monday, April 14, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : जुन्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून; नाशिक हादरलं

Nashik Crime : जुन्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून; नाशिक हादरलं

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

पांडवलेणी परिसरात (Pandavleni Area) रहिवासी वसाहतीत जुन्या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि.१४) रोजी रात्री अकराच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी जुन्या वादातून ज्ञानगंगा सोसायटीत राहणाऱ्या दोघांवर हल्ला चढवला. यात रामदास नारायण बोराडे (वय १४) ज्ञानगंगा सोसायटी, पांडवलेणीच्या पायथ्याशी याचा तलवारीच्या हल्ल्यात खून झाला. तर दुसऱ्या जखमीस खाजगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (दि.१३) रोजी रात्री अकराच्या सुमारास जुना वाद उफाळून आला. यात अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्याने हाती शस्त्र घेऊन जेवण करून बाहेर बसलेल्या रामदास नारायण बोराडे व राजेश बोराडे या दोघा तरुणांवर धारदार शस्त्राने वार केले. हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर हल्लेखोरांनी माउंटन व्ह्यू हॉटेलच्या बाहेर लावलेल्या चारचाकी गाड्यांचे देखील आपल्या शस्त्राने काचा फोडून नुकसान केले व दहशत मोजण्याचा प्रयत्न केला.यावेळी मॅनेजरने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्यावर शस्त्र उगारण्यात आले.

तसेच सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर वार केलेल्या रामदास बोराडे व राजेश बोराडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील रामदास बोराडे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर राजेश सुदाम बोराडे हे गंभीर जखमी झाले असून, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सातपूरच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोवरच पुन्हा एकदा हल्लेखोरानी डोके वर काढले आहे. मागील पंधरा दिवसातच पाथर्डी परिसरात अशा प्रकारचे हल्ले करण्याचे प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. तसेच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

धुळ्यात ई-तिकिटांचा काळाबाजार; एकास अटक, साडे बारा लाखांची तिकिटे जप्त

0
धुळे : प्रतिनिधी- रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. संशयिताकडून एकूण १२ लाख ५३ हजार ८६०...