Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedNashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

Nashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

दाेन दिवसांची पाेलीस काेठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर राेडवरील कपालेश्वर नगरातील निर्माण नक्षत्र साेसायटीत देहव्यापाराचा (Prostitution) अड्डा शहर पाेलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीसी) उद्ध्वस्त केल्यावर या प्रकरणात आता एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पवन क्षिरसागर असे संशयिताचे नाव आहे. पीटा कायद्यान्वये ( PITA Act) दाखल गुन्ह्यात त्याला आडगाव पाेलिसांनी अटकही केली आहे. यापूर्वी अटक हाेऊन जामीनावर सुटलेली साेसायटीतील फ्लॅटधारक संशयित व महिला दलाल कविता साळवे-पाटील व पवन क्षिरसागर यांनी पार्टनरशिपमध्ये कुंटखान्याचा व्यवसाय सुरु ठेवल्याचे तपासात समाेर आले आहे. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : अलिशान साेसायटीत कुंटणखाना; पीसीबी-एमओबीचा छापा, महिलेसह दलाल अटकेत

अलिशान निर्माण नक्षत्र इमारतीतील घरात एका महिलेने (Woman) उच्चभ्रूंसाठी वेश्या व्यवसाय सुरु ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला हाेता. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या पथकाने धाड टाकून दाेन पीडित मुलींची सुटका केली हाेती. कविता साळवे (वय ४०) ही महिला तिच्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजताच पोलिसांनी बुधवारी (दि. ४) रात्री कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली.

हे देखील वाचा : Nashik Accident News : बोराळे फाट्याजवळ भीषण अपघात; तीन युवकांचा मृत्यू

तर वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी संशयित कविता किशाेर साळवे-पाटीलसह जाफर अशरफ मन्सुरी यास अटक केली हाेती. दोघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार(पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासात तिघे संशयित पीडित मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यास प्रवृत्त करीत होते, असे समाेर आले. तपास पाेलीस उपनिरीक्षक मयूर निकम करत आहेत. दरम्यान, क्षिरसागर याला शनिवारी(दि. ७) न्यायालयाने (Court) पुढील दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. 

हे देखील वाचा : “शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न”; जयंत पाटलांचे मोठे विधान

व्याजाच्या धंद्याचे नाव

कविता पाटील निर्माण नक्षत्र साेसायटीत अलिशान फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये राेज वेगवेगळे पुरुष येत जात. त्यामुळे साेसायटी सदस्यांना संशयही येत हाेता. मात्र, आमचा व्याजाने पैसे देण्याघेण्याचा व्यवसाय असल्याचे सांगून तिने तेव्हा वेळ मारुन नेली हाेती. तर, छाप्याच्या कारवाईनंतर कविता फ्लॅटवर आली. तिने साेसायटी पदाधिकारी व सदस्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच ‘आता मी पुन्हा वेश्याव्यवसाय करेल, कोणाला काय करायचे ते करा’ अशी दमदाटी केली. यानंतर इमारतीतील ६० ते ६५ रहिवाशांनी संतप्त होत आडगाव पोलिस ठाण्यात जात तेथे ठिय्या देऊन कठोर कारवाईची मागणी केली हाेती. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेची पोत ओरबाडली

क्षिरसागर वाॅन्टेड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पदाधिकारी पवन क्षिरसागर याच्यावर मालेगाव, नाशिक व अन्य ठिकाणी गंभीर गुन्हे नाेंद आहेत. यात एनडीपीएस (गांज्या तस्करी), विनयभंग धमकी, अरेरावी, तडजाेडीचे गुन्हे नाेंद आहेत. आता नव्याने कुंटनखाना व्यवसायात भागीदारी केल्याचे समाेर येते आहे. दरम्यान, क्षिरसागर हा दाेन वर्षांपासून कविताशी प्रत्यक्ष संगनतमत करुन हा कुंटनखाना चालवित असल्याचे जबाब स्थानिकांनी दिले आहेत. हे व इतर जबाब दाखल झाल्यावर त्याचा उघड सहभाग आढळल्याने त्याला यात अटक झाली आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या