Sunday, April 20, 2025
Homeक्राईमNashik Crime : सुक्का गँगच्या सूत्रधारांचा शोध; चॅटिंग, मेसेज फॉरवर्ड करणारे रडारवर

Nashik Crime : सुक्का गँगच्या सूत्रधारांचा शोध; चॅटिंग, मेसेज फॉरवर्ड करणारे रडारवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काठेगल्लीत (Kathe Galli) मंगळवारी रात्री पोलिसांवर (Police) हल्ला केल्याच्या गुन्ह्यांत अटकेतील ३९ संशयितांना न्याययंत्रणेने शनिवारी (दि. १९) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ही दंगलसदृश स्थिती निर्माण करणाऱ्या सुक्का गँगच्या मास्टरमाईंडचा शोध पोलिसांकडून सुरु झाला आहे.

- Advertisement -

टवाळखोरांसह जमावाचे माथे भडकविणाऱ्या मास्टरमाईंड संशयितांचे (Suspected) शहरात विविध अवैध व्यवसाय असून एकाच गटात मोडणाऱ्या दुसऱ्या गटाने अनधिकृत धार्मिकस्थळ निष्कासित करण्याच्या कारवाईस आक्षेप घेत पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. त्यातच, आता ७७संशयित दुचाकींपैकी काही दुचाकी सखोल चौकशी व पडताळणीअंती मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

काठेगल्लीत घडलेल्या या घटनेत २१ पोलीस अधिकारी व अंमलदार गंभीर जखमी झाले होते. अश्रूधुरांच्या सात नळकांड्या फोडून जमाव नियंत्रित केल्याने पुढील अनर्थ टळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी धाडसत्र राबवून ३९ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी पूर्ण झाली असून आता त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

तर, तपास पथकाने पारंपरिक तपासासह तांत्रिक तपासावर विशेष भर दिला आहे. तर घटनास्थळी किती संशयितांचे मोबाईल अॅक्टिव्ह होते. त्यांच्या व्हॉटस् अॅपमधून चिथावणीचे मेसेज फॉरवर्ड करण्यात आले का?, संशयित कुठून आले होते? दगड मोठ्या प्रमाणात कसे उपलब्ध झाले, या सूक्ष्म बाबींचा तपास सुरु झाला आहे.

सुक्का गँग सीसीटीव्हीत कैद

सुक्का गँग अर्थात एकाच गटातील बेरोजगार मुले, टवाळखोर व नशा करणारे संशयित दगडफेक करताना काही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करण्यापूर्वी जाणीवपूर्वक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या गँगच्या सूत्रधारांनी समाजकंटकांना चिथावणी दिल्याने हा गंभीर प्रकार घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता चिथावणी देणाऱ्यांचा शोध सुरु झाला आहे. इतर तांत्रिक विश्लेषणातून उघड होणाऱ्या माहितीनुसार अटकसत्र सुरु राहील आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर, घटनेच्या दिवशी उस्मानिया चौक येथे रात्री बारा ते अडीच वाजेपर्यंत किती मोबाईल कसे अॅक्टिव्ह होते, त्यानुसार डम्प डाटा मिळविला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : उत्पन्नवाढीसाठी मनपाचा नवा प्रयोग; घनकचरा युजेस चार्जेस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक मनपाची (Nashik NMC) आर्थिक स्थिती कमजोर होत असल्याने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयोग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून...