नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकराेड (Nashik Road) येथील विहितगाव परिसरातील वालदेवी नदीवरील पुलावर (Valdevi River Bridge) ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविणाऱ्या संशयिताला अटक (Arrested) करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत (१९, रा. कब्रस्थानसमोर, गांधीधाम, देवळालीगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे (Suspected) नाव आहे. त्याच्याकडून बाराशे रुपयांचे दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे सहायक उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना संशयित सौरभ हा अप्पा गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदीच्या पुलावर येणार-जाणाऱ्या नागरिकांना त्याच्याकडील कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवित होता.
दरम्यान, खबर मिळताच युनिट दोनचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, नितीन फुलमाळी यांनी पुलाजवळ सापळा रचून संशयित सौरभला अटक केली. त्याच्याकडून दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले. उपनगर पोलिसात (Upnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.