Thursday, May 1, 2025
Homeक्राईमNashik Crime : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; ऐवज जप्त

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; ऐवज जप्त

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

घरफोडी (Burglars) करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना नाशिकरोड गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरी (Theif) करण्यात आलेले तीन लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. या चोरट्यानी नाशिक रोड व परिसरात तब्बल चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे.

- Advertisement -

सिन्नरफाटा (Sinnar Phata) सिटी लिंक रोड परिसरात दोघे संशयास्पदरित्या फिरत आहेत असे समजल्यानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख व विशाल कुंवर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिली. सपोनि प्रविण सूर्यवंशी व पथकाने तत्काळ सिन्नरफाटा येथे धाव घेतली, सिटीलिंक बस डेपोजवळील रस्त्यावर एका रिक्षाजवळ दोन संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साजिद हसन खान (वय २७, रा. अरिंगळे मळा, साईबाबा मंदिर जवळ, नाशिकरोड) आणि निखील चंद्रकांत पेटाप्ते (क्य २५, रा. विहितगाव, नाशिकरोड) अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २.८९,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळाले ते पोलिसांनी जप्त केले. सर्व घरफोड्यांचा तपास पोलीस (Police) हवालदार विजय टेमगर करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस कोठडीतून सराईताचे पलायन; मित्राची मदत, भद्रकाली पोलिसांकडून...

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केलेल्या सराईताने मंगळवारी (दि. २९) सायंकाळी अंमलदाराच्या हाताला हिसका देऊन भद्रकाली पोलीस ठाण्यातून (Bhadrakali Police...