Sunday, April 6, 2025
Homeक्राईमNashik Crime : ड्रग्जविक्रीत गुंतली तरुणाई; मेफेड्रोन विकणारे दोघे मित्र गजाआड

Nashik Crime : ड्रग्जविक्रीत गुंतली तरुणाई; मेफेड्रोन विकणारे दोघे मित्र गजाआड

युनिट दोनसह एनडीपीएसची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात पुन्हा एकदा युनिट दोन आणि एमडीपीएस पथकाने (MDPS Team) एमडी ड्रग्ज विक्रीचा (Drugs Sale) भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे हाताला काम नसल्याने ग्रॅज्युएट व ‘पाचवी पास’ दोघा मित्रांनी घरखर्चासाठी एमडी विक्री सुरु केल्याचे कारवाईतून समोर आले असून जेलरोड येथील नांदूरनाका भागात शुक्रवारी (दि. ४) रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. त्यात सामनगाव रोडवरील म्हाडा बिल्डिंग व अश्विनी कॉलनीत राहणाऱ्या दोघा ड्रग्ज पेडलर मित्रांना ताब्यात घेऊन ९० हजार रुपयांचे १८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जय सुनिल फिरके (वय २५, रा. ९, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) व अंकुश शांताराम चौधरी (वय २४, रा. सी.जी. १, म्हाडा बिल्डींग, सामनगाव रोड, नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून ताबा आडगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक एनडीपीएस गुन्ह्यातील संशयितांची (Suspected) शोध घेत असताना, हवालदार नितीन फुलमाळी यांना दोघे संशयित नांदूरनाका येथील जनार्दन स्वामी पुलाशेजारील नीलकंठेश्वर मंदिरालगत रात्री नऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी ही माहिती एनडीपीएसच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे व युनिट दानचे प्रभारी हेमंत तोडकर यांना दिली. त्यानुसार, सापळा (Trap) रचून कारवाई करण्यात आली. तेव्हा जय याच्याकडे २५ हजारांचे पाच तर अंकुशकडे ६५ हजारांचे १३ ग्रॅम एमडी आढळले. तसेच पाच हजार रुपयांचा मोबाईलही हस्तगत केला. पोलीस आयुक्त. संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सबायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने ही कारवाई युनिट दोन व एनडीपीएस पथकाने संयुक्तरित्या केली.

मुद्दे

  • तीन ते चार हजार रुपये ग्रॅमने विक्री
  • आतापर्यंतच्या बहुतांश गुन्ह्यांत स्लम भागातील पेडलरचा भरणा
  • दोघांनी सुरु केला सहा महिन्यांपासून एमडी विक्रीचा धंदा
  • मुंबई व भिवंडीतून वाहतूक
  • कामधंदा नसल्याने झटपट पैशांसाठी विक्री
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या