नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी पोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाकीवरून नाशिकमध्ये (Nashik) येत उपनगर भागातील (Upnagar Area) माजी नगरसेवक सुनील बाबुराव गोडसे यांच्या घरात घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना गजाआड करण्यात आले आहे.
उपनगर पोलीस व युनिट देोमने ही कारवाई (Action) केली असून एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, ही घरफोडी उघड करण्यासाठी पथकाने नाशिकमधील (Nashik) तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज पडताळून हडपसर येथे राहणाऱ्या सराईतांना पकडले. लखनसिंग राजपूतसिंग दुधानी (३६) व रविलिंग श्यामसिंग कल्याणी (दोघे रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी सराईत घरफोड्यांची नावे आहेत.
सुनील गोडसे (रा. अंगन छाया सोसायटी, प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिकरोड) या माजी नगरसेवकाच्या घराचे लॉक तोडून ३० ते ३५ लाखांचे घरफोडी झाल्याची घटना (दि. १८) घडली होती. गुन्ह्याचे स्वरूप पाहता, दिवसा घरफोड झाल्याने धाडसी चोरी असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊतसहायक आयुक्त डॉ. सचिन बारी व संदीप मिटके आणि बरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस व गुन्हेशाखा युनिट दोनला सूचना केल्या होत्या.
त्यानुसार, तांत्रिक व गोपनिय माहिती काढण्यात आली. तेव्हा ही घरफोडी लखन सिंग व त्याचा साथीदाराने केल्याचे समजले. युनिट दोनचे (Unit Two) प्रभारी हेमंत तोडकर यांच्या निर्देशानुसार, सहायक निरीक्षक समाधान हिरे व टीमने संशयित निष्पन्न करुन लखनसिंगला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत त्याने साथीदार रविसिंगची माहिती दिली. त्यालाही लवकरच गजाआड केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार विनोद लखन, अंमलदार इमान शेख, सूरज गवळी, जयंत शिदे, पंकज करें आदींनी केली.
मुद्देमालाची माहिती देण्यास टाळाटाळ
चोरी वेलेले सोने व रक्कम याबाबत लखन सिंगने समाधानकारक माहिती दिली नाही. पण उपनगर पोलिसांच्या डीबी व युनिट दोनने कौशल्य वापरून वेळोवेळी त्याला पुणे येथे तपासकामी नेले. मानवी कौशल्यानुसार सखोल तपास करून त्याच्याकडून २ लाख, ४६ हजारांची ३० ग्रॅम सोन्याची लगड एक लाख तीस हजारांची चेन, पेंडल व टॉसचा ९३ ग्रॅमचा सेट, ४५ हजारांचे सोने, ४३ हजारांचा इअगिसेट, ४ लाख रुपये असा एकूण ८ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सराईतांचा शोध सुरु
उर्वरित चोरी गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम पसार असलेल्या रविसिंग दुधानीकडे असल्याचे समजते. त्याचा कसोशीने शोध सुरु आहे. दोघे संशयित रेकॉर्डवरील सराईत असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात विविध ठिकाणी ४० ते ४५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ज्या चोरीच्या दुचाकीवरुन येत ही घरफोडी करण्यात आली, त्या दुचाकी चोरीचाही गुन्हा उघड झाला आहे.