Sunday, April 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील काही मुजोर रिक्षाचालकांनी (Rickshaw Driver) आता निर्लज्जपणाचा कळस गाठून सर्वच सीमा पार केल्याचे पुणे रोडवर (Pune Road) शुक्रवारी रात्री घडलेल्या गंभीर घटनेनंतर समोर आले आहे. रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय पीडितेसमोर तडीपार रिक्षाचालकाने नग्न होत तिचा पाठलाग करुन अश्लील शब्द वापरले. या घटनेने खळबळ उडाली असून मुंबईनाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) तपास करुन तडीपार गुन्हेगार व रिक्षाचालक संशयित मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख (वय २०, रा. बागवान पुरा, जुने नाशिक) याला अटक केली आहे.

- Advertisement -

पीडिता गुरुवारी (दि. १०) रात्री दहा वाजता उपनगर (Upnagar) येथून द्वारका भागात येत होती. तेव्हा बोधलेनगर ते द्वारका सर्कलदरम्यान, संशयित मिजान याने रिक्षेतून तिचा पाठलाग सुरु केला. यावेळी त्याने पीडितेस वेळोवेळी ‘तुमको किधर जाना है?’ असे विचारून वाईट नजरने बघितले. तर, अश्लील हातवारे करून पाठलाग केल्यावर द्वारका सर्कल येथे त्याने अंगावरील सर्वच कपडे काढून नग्न होत तिला अश्लील इशारे केले. यानंतर तिला ‘तुझे छोडुंगा नहीं’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. या घटनेने पीडिता पूर्णतः घाबरली. तिने कशीबशी सुटका करुन घेत घर गाठल्यावर दुसऱ्या दिवशी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जाऊन रिक्षाचालकाविरोधात फिर्याद दाखल केली.

दरम्यान, त्यानुसार, गुन्हा (Case) नोंद होताच सीसीटीव्ही व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिजानचा शोध घेऊन त्याला अटक (Arrested) केली आहे. त्याच्याकडे सखोल तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली. तसेच विविध महत्त्वाच्या ठिकाणी व्हिजिबल पोलिसिंग नजरेआड गेल्याने काही सराईत रिक्षाचालक, दुचाकीस्वार शहरवासियांना वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाईची (Action) अपेक्षा सामान्यांनी केली आहे.

रात्री सरप्राईज चेकिंग गरजेची

शहरातील पंचवटी कारंजा, आडगाव नाका, द्वारका चौक, मुंबईनाका, सीबीएस, शालिमार, ठक्कर बजार, टाकळी, जेलरोड, उपनगर, देवळाली गाव, नाशिकरोड या ठिकाणी काही सराईत रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. या भागात पोलिसांनी रात्री सात वाजेनंतर सरप्राईज व्हिजीट करुन रिक्षाचालकांच्या कागदपत्रांसह ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असलेली रिक्षा व चालकांवरील विशेष कारवाई बंद झाली असून ती अविरत सुरु ठेवण्याची मागणी स्थानिकांसह परजिल्ह्यातील प्रवाशांनी केली आहे.

सिटीलिंकची काचही फोडली

पीडितेचा विनयभंग केल्यावर रिक्षाचालक मिजानने साथीदाराच्या मदतीने द्वारका भागात येथेच्छ धुडगूस घातला. दोघांनी रस्त्याने जाणाऱ्या सिटीलिंक बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या बसच्या काचेवर दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

मुद्दे

  • सराईतावर चेनस्नॅचिंगसह अन्य गंभीर गुन्हे
  • मद्य वा स्वस्त नशा केल्यानंतर केले कृत्य
  • गुन्ह्याच्या फिर्यादीनंतर रिक्षा जप्त, अटकेची कारवाई
  • काही महिन्यांपूर्वीच तडिपारी; तरी त्याचे शहरात वास्तव्य, व्यवसाय
  • रिक्षाचालकांवर निरंतर कारवाईची मागणी
  • अनेक रिक्षाचालकांचा गुन्हेगारीत सहभाग
  • काही रिक्षा स्टॅन्ड, मोकळ्या जागी उघड्यावरच चालकांच्या मद्यपार्ट्या
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? शहांच्या भेटीनंतर शिंदेंचा मंत्री...

0
मुंबई | Mumbai महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad) पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर शिंदेंच्या...