येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुका पोलिसांनी (Taluka Police) छापा (Raid) कारवाई करत चार अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिल उर्फ लंगड्या सुरेश चव्हाण रा. शिरूर, अवील उर्फ आंधळ्या आदित्य विकास भोसले रा. शिंगणापूर, आग्या शायरी चव्हाण रा. शिंगणापूर, साईनाथ जाधव रा. गोल्हेवाडी ता. येवला या चौघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडून १० तोळे सोन्याची दागिने, दोन दुचाकी आणि चोरी करण्यासाठी वापरलेले कटवणी, हेक्सा ब्लेडसह असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना (Police) यश आले. या गुन्हेगारांनी निफाड, येवला आणि वैजापूर तालुक्यात चौदा ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुली दिली आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांना येवला न्यायालयात (Yeola Court) हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.





