Wednesday, July 29, 2026
Homeक्राईमNashik Crime : घरफोडी करणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात; 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : घरफोडी करणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात; ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

म्हसरूळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने (Mhasrul Crime Investigation Team) घरफोडी (Burglary) करणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात घेत तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. मानेनगर येथे ९ जून रोजी अविनाश प्रकाश थोरात यांच्या घरात घरफोडी झाली होती. तर २९ जून रोजी स्वप्निल प्रकाश पेटकर यांच्या बांधकाम साईटवरून ब्रॉन्झ धातूचे डायव्हर्टर चोरीला गेले होते.

- Advertisement -

नाशिक शहरात (Nashik City) वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासासाठी विशेष आदेश दिले होते. १२ ऑगस्ट रोजी म्हसरूळ गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विधीसंघर्षित बालकास पालकांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल सोनार व भंगार विक्रेत्यांना विकल्याचेही त्याने सांगितले.

जप्त केलेल्या ऐवजात दोन लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) तीस हजार रुपयांची चांदीची लगड, सात हजारांचा चांदीचा कमरपट्टा, तीन हजारांचा चांदीचा छल्ला आणि साठ हजारांचे ब्रॉन्झ व पितळ धातूचे डायव्हर्टर असा एकूण तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Commissioner Sandeep Karnik) परिमंडळ एकचे उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक दीपक पटारे, एएसआय बाळासाहेब मुर्तडक व गुन्हे शोध पथकाच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Manoj Jarange : २९ ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन करणार – मनोज...

0
मुंबई | Mumbai मराठा समाजाला (Maratha Community) वेड्यात काढण्याचे काम सुरू असून, आता आरक्षणासाठी (Reservation) आरपारची लढाई लढली जाईल. येत्या २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना...