Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nashik Crime : गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchvati Police Station) हद्दीत पाच महिन्यापूर्वी दोन गटात दगडफेक होऊन गोळीबार केल्याची घटना फुलेनगर परिसरातील (Phulenagar Area) मुंजोबा चौकात घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कामगिरी केली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की, दि.२२ जुलै २०२५ रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फुलेनलगर येथील मुंजाबा चौक परिसरात दोन गटात दगडफेक व गोळीबाराची (Firing) घटना घडली होती. त्यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यच्या तपासाबाबत व आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.

YouTube video player

त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक (Crime Squad) फरार आरोपीच्या मागावर असतांना अंमलदार पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुन्ह्यातील फरार आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे (वय २२ वर्षे रा. कुमावत नगर, गल्ली नं.४, जोगींगट्रेक जवळ, पंचवटी) हा आडगांव नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यास गुन्हे शोध पथकाने सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. ऋषिकेश उर्फ बाबा गणेश याच्यावर सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती आमणे (प्रशासन) या करत आहेत.

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश शिरसाठ,उपनिरीक्षक कैलास जाधव, अंमलदार पोलीस हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर , काळे, संतोष पवार, पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड, अंकुश काळे अंमलदार परदेशी, बाहिकर शिपाई वायंकडे, चितळकर, पवार, देशमुख महिला पोलीस शिपाई भोईर यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...