नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काहीतरी वादातून तरुणाचे अपहरण (kidnapping) करुन त्याला जबर मारहाण (Beating) करुन पळ काढलेल्या सराईतास अखेर तीन वर्षांनी गजाआड करण्यात गुंडाविराेधी पथकास यश आले आहे. रविंद्र उर्फ दादू पोपट डोलनर (वय ३८, रा. वज्रेश्वरी नगर, पंचवटी) असे संशयिताचे (Suspected) नाव असून ताे गुन्हा केल्यापासून तब्बल अडीच ते तीन वर्षांपासून परागंदा हाेता.
हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थाच्या तयारीला वेग
५ जून २०२२ रोजी रात्री कुणाल थोरात या तरुणाला (Youth) सहा ते सात संशयितांनी पंचवटीतून अपहरण करुन वज्रेश्वरी नगर झोपडपट्टीच्या मैदानात आणत पूर्ववैमनस्यातुन कुरापत काढुन दांडके व दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले हाेते. यानंतर सर्वच संशयित पळून गेले हाेते. पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली हाेती. मात्र, मुख्य सूत्रधार डोलनर हा तेव्हापासून पसार होता. पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकास सराईत व पसार संशयितांना पकडण्याचे आदेश दिले हाेते.
हे देखील वाचा : श्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार; कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात
त्यानुसार पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना डाेलनर याची माहिती मिळाली. डाेलनर हा दाेन ते अडीच वर्षांपासून स्वतःची ओळख लपवून कर्नाटक, गुजरात या राज्यांत वास्तव्य करत हाेता. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने आहिल्यानगरातील राहुरी येथे रवाना हाेत येथील कॉलेज रोडजवळील चव्हाण वस्ती येथे सापळा रचून डोलनर याला ताब्यात घेतले. त्याचा ताबा पंचवटी पोलीसांकडे (Police) देण्यात आला आहे.