नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
चोरीची मोटारसायकल (Stolen Motorcycle) वापरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ (Crime Branch Unit 2) च्या पथकाने सापळा रचून अटक केली.
गुन्हे शाखा, युनिट-२ सहायक उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, शंकर काळे, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, किरण अहिरराव, प्रकाश बोडके, मनोज परदेशी, वाल्मीक चव्हाण यांनी पाथर्डीफाटा येथील एस. के. लॉन्स समोरून सचिन केशव पाटील (२८, रा. आनंदवली शिवार, गंगापूररोड नाशिक), अनिल सुभाष चिंतामणी (२९, रा. मुळ रा. वडाळा महादेव लक्ष्मीनगर, ता. श्रीरामपूर, जि. आहिल्यानगर, सध्या रा. आनंदवली घरकुल योजनाच्या मागील बाजुस, पत्राचे शेडमध्ये आनदंवली, गंगापूररोड, नाशिक) यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे असलेली बजान कंपनीची पल्सर मोटार सायकल (एम.एच.१५ जे एल ९७६५ ही चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यांनी सदर पल्सर मोटारसायकलवर सातपूर, आडगाव व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगचे (Chainsnatching) गुन्हे के ले असल्याबाबत कबुली दिली.दोन्ही संशयितांकडून चेनस्नॅचिंगचे एकूण ४ गुन्हे व अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) कडील मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ५६.५५ ग्रॅम सोने, ०१ बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण ४ लाख ८१ हजार ४०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना पुढील तपासकामी सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.
दरम्यान, ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.२ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार, सहायक निरीक्षक समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, शंकर काळे, गुलाब सोनार, विलास गांगुर्डे, बाळु शेळके, हवालदार नंदकुमार नांदुडर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, सुनिल आहेर, संजय सानप, मनोहर शिंदे, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, किरण अहिरराव, नितीन फुलमाळी, परमेश्वर दराडे, अंमलदार जितेंद्र वजीरे, महेश खांडबहाले, संजय पोटींदे, तेजस मते यांनी केली.