Friday, May 1, 2026
Homeक्राईमNashik Crime : बडतर्फ मयूरचा भाऊ सागरही निलंबित; वादग्रस्त पोलीस बंधूंचे कारनामे...

Nashik Crime : बडतर्फ मयूरचा भाऊ सागरही निलंबित; वादग्रस्त पोलीस बंधूंचे कारनामे जगजाहीर

मोबाईल खेचून नेल्याचे उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्यावसायिकाकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) बडतर्फ केलेल्या पोलीस अंमलदार मयूर हजारी (Mayur Hazari) याचा सख्खा भाऊ सागर यालाही एका गंभीर गुन्ह्याच्या चौकशीतील गोपनीय अहवालाअंती पोलीस खात्यातून निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. नाशिक शहर पोलीस मुख्यालयास नेमणुकीस असलेल्या सागर अमरसिंग हजारी याच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नुकतेच जारी केले आहेत.

- Advertisement -

गंगापूर रोड परिसरात एका व्यक्तीला अडवून त्याला पोलीस (Police) असल्याची बतावणी करुन शिवीगाळ व मारहाण करीत त्याचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी अंमलदार सागर हजारीविरुद्ध गंगापूर पोलिसांत (Gangapur Police) गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी त्याच्या अशा वर्तनाचा अहवाल आयुक्तालयापर्यंत पोहोचल्यावर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. कॉलेजरोड परिसरात असलेल्या एका कॅफेमधील कामगार प्रेम खत्री याने गंगापूर पोलिसांत तक्रार दिली.

यानंतर २० मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास डी. के. नगर परिसरातील बाळासाहेब उद्यान चौकात खत्री याला सागरने अडविले. पोलिसाचे ओळखपत्र दर्शवून ‘तुला माहित नाही का, मी कोण आहे. तू मला ओळखत नाही का? मी पोलीस सागर हजारी आहे’, असे बोलून सागर व त्याच्या एका मित्राने खत्री याला शिवागीळ व मारहाण (Beating) केली.त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेबाराच्या सुमारास खत्री काम करीत असलेल्या कॅफेजवळ जात त्याचा मोबाइल हिसकावून पुन्हा मारहाण व शिवीगाळ केली. त्यावरुन सागरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५, ३५१, ३५२ (२) व (३) प्रमाणे गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

दोनदा हजेरी बंधनकारक

तक्रारदार खत्री हे नेपाळचे रहिवाशी असून, उदरनिर्वाहासाठी नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची सुरक्षा करणे पोलिसांचे कर्तव्य असताना पोलिसाने त्यांना मारहाण व शिवीगाळ करून शिस्तीस न शोभणारे बेजबाबदार वर्तन केल्याचे निष्पन्न झाल्याचा ठपका आयुक्तालयाने ठेवला आहे. त्यानुसार आयुक्त कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलिस (शिक्षा व अपिल) नियम १९५६, पोलीस नियमावली, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार सागर हजारी याला त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचे आधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. सागरला दिवसातून दोन वेळा मुख्यालयात हजेर रहावे लागणार आहे.

तो तर दुसऱ्यांदा बडतर्फ

दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तिकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी बडतर्फ होत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून (मॅट) स्थगिती मिळवत वर्षभरापूर्वी पुन्हा शहर पोलीस दलात रूजू झालेला वादग्रस्त अंमलदाराविरुद्ध काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा बडतर्फीची कारवाई झाली. ‘मॅट’च्या आदेशान्वये, शहर पोलीस आयुक्तालयाने केलेल्या विभागीय चौकशीअंती दोषी ठरवत आयुक्त संदीप कर्णिक यांनी मयूर अमरसिंग हजारी (बक्कल नं. २७०८) याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. मयूर हा सागर याचा भाऊ आहे. मयूर आता परत ‘मॅट’मध्ये दाद मागणार असल्याचे कळते.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...