Sunday, April 6, 2025
Homeक्राईमNashik Crime : तस्करांचा 'युवराज' निलंबित; पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज तस्करीत केले सहसंशयित

Nashik Crime : तस्करांचा ‘युवराज’ निलंबित; पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज तस्करीत केले सहसंशयित

५०० 'कॉल्स'मुळे होणार अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील (Nashik City) सराईत गुन्हेगार (Police Constable) व तस्करांच्या गळ्यातील ताईत बनलेला वादग्रस्त पोलीस हवालदार युवराज शांताराम पाटील याचा थेट एमडी ड्रग्ज (MD Drugs) व गोवंश तस्करीच्या दाखल गुन्ह्यांत थेट सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे. खात्यांतर्गत चौकशीत त्याचे कृत्य समोर आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्याला निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच ज्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळला आहे, त्या गुन्ह्यात (Case) त्याला मुख्य संशयितासह (Suspected) सहसंशयित केले असून चौकशी पूर्ण होताच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक ‘एनडीपीएस’ पथकाने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी वडाळा गावात छापा (Raid) टाकून ‘ड्रज’ तस्कर वसीम रफीक शेख (वय ३६) वनसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (वय ३२, रा. सादिकनगर, वडाळागाव) यांना अटक केली होती. त्यांचे सात-आठ मोबाइल जप्त केले होते. पुढील तपासात छोटी भाभीचा पती इम्तियाज शेखला जिल्ह्याबाहेरुन व इतरांना अटक (Arrested) झाली होती. यापैकी वसीम, छोटी भाभी व इम्तियाज कारागृहात आहेत. तर, प्रकरणात इरफान उर्फ चिपड्या शेख (रा. सादिकनगर, वडाळा), करण सोनटक्के (रा. नाशिकरोड) यांनाही गतवर्षी अटक झाली. इरफानची एका आमदाराशी ‘जवळीक’ होती. याच प्रकरणात संशयित पोलीस कर्मचारी युवराज पाटील याने इतर संशयितांसोबत वारंवार फोनवरुन संपर्क साधल्याचा आरोप आहे. तर, तस्करांना मदत करण्याच्या उद्देशाने तब्बल पाचशे कॉल्स केल्याचे समोर येत आहे. त्याबाबत सखोल तपास सुरु झाला आहे.

हे आहे प्रकरण

युवराज पाटील याचा इंदिरानगर येथे दाखल गुन्हा नंबर १६३/२०२४ (एनडीपीएस), ४१२/२०२४ (एनडीपीएस), नाशिकरोड येथील ४२५/२०२३ (एनडीपीएस), १६९/२०२४ (एनडीपीएस) या गुन्ह्यातील संशयितांसोबत वारंवार संपर्क व संभाषण झाल्याचे तपासात उघड झाले आहे. यासह प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गोवंश मांस विक्री व वाहतूक संदर्भात इंदिरानगर पोलिसांत दाखल १५४/२०२३, ३५८/२०२४, भद्रकालीतील ६१/२०२३ या गुन्ह्यातील संशयितांसोबत वारंवार फोनद्वारे संभाषण व संपर्क झाल्याचेही समोर येते आहे. गंभीर बाब म्हणजे, इंदिरानगर पोलिसांत दाखल २६८/२०२३ (एनडीपीएस) या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.

मुद्दे

  • युवराजने इतर संशयितांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप
  • संशयित हे ‘खबरी’ असल्याचा त्याचा दावा; मात्र खबरीनुसार एकही कारवाई नाही
  • प्राथमिक चौकशीत त्याने असमानधाकारक जबाब दिला आहे
  • त्याने इतर संशयितांना पाठीशी घालण्यासह मदत केल्याचा आरोप
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : फ्लॅट विक्रीपोटी पावणेतीन लाखांचा गंडा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik संशयित (Suspectd) रियल इस्टेट एजंटने साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून फ्लॅट विक्रीपोटी एका व्यक्तीस पावणेतीन लाख रुपयांचा गंडा (Fraud) घातला...