Saturday, May 3, 2025
Homeक्राईमNashik Crime : जाधव बंधू हत्याप्रकरण; पाच जणांना तिसऱ्यांदा पोलीस कोठडी मंजूर

Nashik Crime : जाधव बंधू हत्याप्रकरण; पाच जणांना तिसऱ्यांदा पोलीस कोठडी मंजूर

एसआयटीसमक्ष संशयित आमनेसामने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर (Upnagar) येथील आंबेडकरवाडीत जाधव बंधू हत्याकांडासह (Jadhav Brother Murder Case) कटात सहभागी सातवा संशयित मंगेश चंद्रकांत रोकडे याच्या अटकेनंतर या हत्याकांडात वापरण्यात आलेल्या व खरेदी केलेल्या हत्यारांची माहिती उघड होणार आहे. कारण, एसआयटीने (SIT) पूर्वी अटकेत राहून न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच संशयितांचा न्यायालयाकडून सलग तिसऱ्यांदा ताबा मिळविला आहे. त्यामुळे आता सातवा संशयित मंगेश व इतर पाच संशयितांना समोरासमोर बसवून खून प्रकरणासह हत्यारांच्या खरेदीसह वापरानंतर त्यांची विल्हेवाट व कटाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. खूनांत वापरलेली सर्वच वाहने, हत्येसाठी अर्थपुरवठा केला का? कुणी केला याचा उलगडा लवकरच होणार आहे.

- Advertisement -

सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्रीनगर), योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकरवाडी), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (२६, रा. नवीन सिडको) अशी पाच मुख्य संशयितांची नावे असून त्यांना न्यायालयाने (Court) एसआयटीच्या विनंतीनुसार २५ एप्रिल रोजी पोलीस कोठडी सुनावली होती. त्या तपासात सहावा संशयित (Suspected) योगेश गरड याला पकडण्यात आले होते. त्यांनतर, सातवा संशयित मंगेश रोकडे याचे नाव समोर आले. मात्र तो १९ मार्चपासून (रंगपंचमी) परागंदा होता. त्याचा शोध सुरु असताना गुंडाविरोधी पथकाने ठाणे येथील मनोरमानगर स्लम भागातून नुकतीच अटक (Arrested) केली होती.

दरम्यान, वरील पाच संशयितांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांना ‘एमसीआर’ सुनावला होता. याचवेळी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त आणि एसआयटीचे (विशेष तपास पथक) प्रमुख संदीप मिटके यांनी तपासादरम्यान वाहने, धारदार हत्यारे व त्यांची विल्हेवाट आणि खरेदीबाबत काही महत्वाच्या मुद्यांचा तपास करावायचा असल्याने संशयितांचा ताबा पुन्हा एसआयटीकडे देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यानंतर, न्यायालयाने काही मुद्यांवर कटाक्ष टाकून सलग तिसऱ्यांदा पाच संशयितांचा ताबा एसआयटीकडे सोपविला.

एसआयटीमुळे दोघांचा तपास

उमेश व प्रशांत या सख्ख्या भावांचा खून (Murder) करण्यात आल्यावर मृतांच्या नातलगांसह विविध संघटनांसह मित्रपरिवाराने पोलीस तपासावर संशय व्यक्त केला होता. या निषेधार्थ मोर्चाही काढला होता. तत्पूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या हत्याकांडाचा विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचे आदेश काढले. या एसआयटीची जबाबदारी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविली. अखेर या एसआयटीने पाच आरोपींव्यतिरिक्त कटातील दोघांचा सहभाग उघड केला असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींवर रक्तांचे नमूने मिळाले आहेत.

हत्यारे कोणी पुरवली याचा तपास

– कटाचा मास्टरमाईंड कोण हे कोडे उलगडणार
– हत्या का झाल्या याची माहिती उघड होणार
– हत्यारांची लवकरच रिकव्हरी होणार
– सहावा संशयित सागरचा सख्खा भाऊ योगेश गरड
– सातवा संशयित मंगेश ४२ दिवसांपासून नातगांकडे आश्रयास
– हत्येसाठी तलवार, कोयते, जांबिया व इतर टणक हत्यारांचा वापर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : पुन्हा सायबर फ्रॉड; शेअर मार्केटच्या नादात गमवले...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शेअर मार्केट व आयपीओत गुंतवणूक (Share Market and IPO Investment) करण्यास भाग पाडून शहरातील दोघा ब्रोकरांसह सायबर चोरांनी (Thief) गुंतवणुकदारांना...