Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमNashik Crime : रिव्हॉल्व्हर रोखणे अंगरक्षकास अंगलट; पोलीस अधिक्षकांकडून गंभीर दखल

Nashik Crime : रिव्हॉल्व्हर रोखणे अंगरक्षकास अंगलट; पोलीस अधिक्षकांकडून गंभीर दखल

तंदूर रोटीच्या नादात निलंबन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मध्यरात्री आस्थापना बंद होत असतानाच तंदूर रोटीसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन (Nashik Road Railway Station) येथील एका हॉटेलमध्ये नाशिक ग्रामीणच्या पोलीस (Nashik Rural Police) अंमलदाराने हॉटेलच्या व्यवस्थापकावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखल्याचा प्रकार नुकताच घडला हाेता. याप्रकरणाची गंभीर दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घेतली असून संशयित पोलीस अंमलदारास निलंबित (Suspended) केले आहे. तसेच विभागीय चौकशीचे आदेश दिले असून नाशिकरोड पोलिसांकडून या अंमलदारास अटक हाेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विशाल झगडे (रा. ग्रामीण पोलीस मुख्यालय, आडगाव, नाशिक) असे रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्या अंमलदाराचे नाव आहे. तो नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून जिल्ह्यातील शिंदे गटाच्या एका आमदाराचा तो अंगरक्षक असल्याचे कळते. यापूर्वीही त्याने अनेकांना धमकावल्याचेही प्रकार समोर आले आहे. सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे व्यवस्थापक असून, शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलीस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये (Hotel) दोघा साथीदारांसह जेवणासाठी आला.

त्यावेळी त्याने हॉटेलमधील वेटर सीराज शेख यास बोलावून तंदूर रोटी मागितली. त्यावेळी त्याने रोटी संपल्याचे सांगताच विशाल झगडे याने वेटरला शिवीगाळ करीत, त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर रोखली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित पोलीस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करण्यासह अग्निशस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या