Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Crime : 'रिल्स'वरील मुजाेरीवर करडी नजर; साेशल मिडियावर दहशत माजविणाऱ्या लाेंढे,...

Nashik Crime : ‘रिल्स’वरील मुजाेरीवर करडी नजर; साेशल मिडियावर दहशत माजविणाऱ्या लाेंढे, परदेशी, वाघ, बाेकडवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) मागील दहा महिन्यात ४६ खून (Murder) झाल्याने शहर पोलीसांच्या (Police) गुन्हेगारी नियंत्रणावर नाशिककरांनी बोट ठेवले आहे. त्यानंतर, पोलीस ‘ॲक्शन मोड’ वर आले असून स्थानिक राजकारण्यांसह त्यांनी पोससेल्या गुंडांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, धमकी व इशाऱ्याचे ‘खळबळजनक’ रिल्स व्हायरल करीत लोकांच्या मनात दहशत निर्माण केल्याप्रकरणी रिपाइचे पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पुत्र आणि ‘प्रोटेक्शन मनी’ तील गोळीबाराचा म्होरक्या भूषण लोंढे याच्यासह साथीदारांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोंढेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

भूषण लोंढे, अभी रानडे उर्फ लाला, मयूर निकम, आदित्य भरत लोखंडे व इतर चार साथीदार यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई भगवान शिंदे यांनी सरकार पक्षाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोशल मिडीया माॅनिटरिंग करत असताना, त्यांना एक धमकी व इशारा देणारा व्हिडीओ दिसला. त्यांनी संविस्तर माहिती घेतली असता, त्यात सराईत भूषण लोंढेसह त्याचे वरील समर्थक भाईगिरी व दहशत करण्यासाठी ‘रिल’ बनवून इशारा देत असल्याचे आढळून आले.

YouTube video player

विशेष म्हणजे सातपूरच्या नाईस संकुलातील ‘हॉटेल औरा’ बारमध्ये ४ सप्टेंबर रोजी पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या आदल्या दिवशीच म्हणजे ३ सप्टेंबर रोजी abhi ranade77 या इन्स्टा आयडीवरुन संशयित लाला याने भूषण लोंढे, अभि रानडे, मयूर निकम, व्हिडीओ बनविणारा आदित्य भरत लोखंडे व इतर चौघांनी औरा बारमध्ये उपस्थित राहून ‘काहीतरी मोठा विषय आहे, यंदा लय मोठा विषय आहे, यहाँ पर मेरे कहने पर दिन और रात’, अशा धमकी स्वरुपातील बॅकग्राऊंड ऑडियो फिक्स करुन दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे या रीलमध्ये काही अल्पवयीन तसेच परिसरातील दुकानदार व ज्येष्ठ नागरिकदेखिल सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी भूषण हा संशयितांसह ‘हॉटेल औरा’ मध्ये उभा राहून दहशत पसरवित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘साेशल मिडीयावर माॅनिटरिंग’

शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवायांंवर जोर दिला असतानाच आता बॅनरवर झळकणारे सराईत हेरण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या पाच दिवसात २२ हून आधिक सराईतांवर स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात आले असून यात पाेलिसांनी ‘साेशल मिडीया माॅनिटरिंग’वर भर देऊन दहशत, भाईगिरीचे रिल्स व्हायरल करणाऱ्यांना धुंडाळून काढत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे रस्त्यासह गल्लीबाेळातील ‘भाईगिरी’वर अंकुश येणार आहे.

कुंदन परदेशीसह वाघ, बाेकडवर गुन्हा

इन्स्टग्राम अकाऊंटवर दहशतीचे तसेच गंभीर गुन्ह्यात अटक करुन बेड्या ठाेकत शहर पाेलीस काही संशयितांना न्यायालय व अथवा पाेलीस ठाण्यात नेत असल्याचे व्हिडीओ, त्याला धमकीचे ऑडिओ व काही चित्रपटातील गीते फिक्स करुन भिती निर्माण करणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आराेपी कुंदन सुरेश परदेशी याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, सराईत गुंड गणेश सुरेश वाघ, मंगेश सावकार गिते, अमाेल काळू बाेकड(रा. जलालपूर) व सलीम माेहम्मद शेख (रा. चुंचाळे) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कुंदन हा सराईत असून त्याला सुनील वाघ हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. तसेच, विविध खून, प्राणघातक हल्ले, खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताे जामिनावर असल्याचे कळते. तर गणेश वाघ उर्फ गण्या कावळ्या याच्यावरही खून, जीवघेणे हल्ले व गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाेंद आहेत.

मुद्दे

  • आराेपी कुंदन परदेशी मामा राजवाडेसाेबत भेट घेताना व्हिडीओ
  • बहुतांश सराईतांचे दाेन हून अधिक इन्स्टा अकाऊंट
  • अनेक अकाऊंट अजूनही सुरुच, बंद करण्याची कार्यवाही स्लाे
  • सात अकाऊंटवर ७७ हून अधिक व्हिडीओ रिल्स
  • खलनायक_बीके, डीके_फॅमिली व तत्सम नावांचे अकाऊंट सुरुच

ताज्या बातम्या