नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत विविध गुन्ह्यांतील हस्तगत केलेला ५० लाख मुद्देमाल परत करण्यात आला. वर्षभरात अंबड पोलिसांनी तब्बल २ कोटी, ९९ लाख, ६४ हजार ५१२ रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांमधील हस्तगत सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी, रिक्षा मोटारसायकल असा १५ गुन्ह्यांतील ५० लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.
गुन्हे उघडकीस आणण्याची कार्मागरी उपायुक्त परिमंडळ २ किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त, अंबड विभाग सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे जग्वेंद्रसिंग राजपूत व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार छबू सानप, अमित गोसावी, योगेश देसले, राहुल जगझाप, मयूर पवार, अनिल गाढवे, तुषार मते, संजय सपकाळे, फरीद इनामदार, समाधान शिंदे, केशव ढगे, सागर जाधव, प्रवीण राठोड, संदीप भुरे, एखंडे यांनी केली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान १६५ विविध गुन्ह्यांतील (Crime) तब्बल २ कोटी ९९ लाख ६४ लाख ५१२ रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे.




