Thursday, September 10, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'बॉस'च्या भुयारातील बैठका रडारवर; अनेक सीसीटीव्हींचे डीव्हीआर जप्त

Nashik Crime : ‘बॉस’च्या भुयारातील बैठका रडारवर; अनेक सीसीटीव्हींचे डीव्हीआर जप्त

सहा जणांना वाढीव कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूरच्या (Satpur) ‘ऑरा’ बारमधील गोळीबार प्रकरणाच्या (Firing Case) तपासात पोलिसांना (Police) संशयित प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांच्या ‘धम्मतीर्थ’ संपर्क कार्यालयात शनिवारी ‘गुप्त भुयार’ सापडल्यानंतर आता येथील अनेक सीसीटीव्हींचे ‘डीव्हीआर बॉक्स’ पोलिसांनी जप्त केले आहेत. गेल्या काही वर्षांत व महिन्यांत या कार्यालयासह भुयारात घडलेल्या प्रत्येक नियोजन हालचालीसह बैठकांची माहिती काढली जाणार आहे. विशेष म्हणजे याच डीव्हीआरमधून बैठकांना ‘हजर’ असणारे काही व्यक्ती, नेते, संशयित रडारवर आले असून त्यांना लवकरच सातपूर पोलीस ठाण्याचा रस्ता दाखविला जाणार आहे.

- Advertisement -

प्रोटेक्शन मनीसह अन्य वादातून घडलेल्या गोळीबारात अटकेत (Arrested) असलेले ‘पीएल’ ग्रुपचे संस्थापक माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे याच्या ‘धम्मतीर्थ’ संपर्क कार्यालयात सातपूर पोलिसांनी (Satpur Police) शनिवारी (दि.११) रोजी गोळीबार, अपहरण, खंडणीसह फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान छापा टाकल्यानंतर तेथे गुप्त भुयार आढळून आले. त्यात, कुऱ्हाड, कांबी, चाकू आणि अन्य प्राणघातक हत्यारे व महागड्या मद्याचे ब्रॅन्ड जप्त करुन ‘बेडरूम्स’ मधून काही आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. ‘बॉस’च्या याच भुयारात काही वर्षांपूर्वी ‘दुहेरी हत्या झाल्याचा आरोप होता. त्यातून लोंढे पुत्र भूषण व इतर संशयित न्यायालयाच्या आदेशाने निर्दोषमुक्त सुटले होते.

दरम्यान, ऑरा बारबाहेरील (Aura Bar) राड्यानंतर संशयित भूषण लोंढे अद्याप पसार असून आतापर्यंत नऊ संशयितांना अटक झाल्यावर न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपल्याने सातपूर पोलिसांनी नऊ संशयितांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले. तेव्हा पोलिसांनी पूर्वीच अटकेत असलेले शुभम पाटील उर्फ भुऱ्या, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करुन उर्वरित सहा संशयित प्रकाश लोंढे, दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, संतोष पवार उर्फ जल्लाद, अमोल पगारे, देवेश शिरताटे व शुभम गोसावी यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजेच येत्या मंगळवारपर्यंत (दि. १४) वाढीव पोलीस कोठडी सुनावली. गेल्या चार दिवसांपूर्वी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे म्हणताना लोंढेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, मंगळवारी संशयितांना न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.

लोंढेनी लावली किल्ली

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे व त्यांच्या पथकाने शनिवारी लोंढेना सोबत घेत आयटीआय सिग्नलजवळील त्यांचे संपर्क कार्यालय गाठले. याच कार्यालयाच्या तळघरात ‘गुप्त भुयार’ आढळले. या भुयाराच्या दरवाजाच्या किल्ली शोधून लोंढे यांनी भिंतींना असलेले फर्निचर किंचिंत हलविल्यानंतर गुप्त भुयाराचे दार उघडले. जेव्हा पोलीस आत गेले, तेव्हा तेथे धारदार हत्यारे, डीव्हीआर बॉक्स मद्यसाठा असा २५ हजारांचा ऐवज आढळून आला व दोन बेडरूम असल्याचे समोर आले. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल उज्जैन येथून खरेदी केल्याचे उघड होत असून भूषणच्या शोधार्थ तीन पथके मागावर आहेत.

ठळक मुद्दे

  • रविवारी न्यायालयाला आरसीपीसह पोलीस छावणीचे स्वरुप
  • शंभर मीटर परिघात येण्यास नागरिकांना प्रतिबंध
  • पोलीस उपासुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड, प्रकाश आहिरे यांचे लक्ष
  • लोंढेची सुनावणी सुरु असतानाच अजय बागूल न्यायालयात

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...