नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) (NDCC Bank) कायमस्वरुपी तत्वावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून पंधरा लाख रुपये उकळल्याच्या दाखल गुन्ह्यात माजी अध्यक्ष परवेज कोकणी (Parvez Kokani) भूमिगत झाले आहेत. दरम्यान, मुंबईनाका पोलीस (Mumbai Naka Police) या प्रकरणात सर्वच पुरावे संकलित करत असून कोकणी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी एनडीसीसीत फसवणूक झालेल्या व्यक्तिंनी तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर गेल्या काही वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता त्यात आणखी एका गंभीर आरोपाची भर पडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा अविश्वासाचा प्रकाश पडला असून आशिष केशव बनकर (रा. काठे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१६ ते २०२५ या दरम्यान संशयित परवेज कोकणी, भास्कर बोराडे आणि मोबीन मिर्झा यांनी नोकरीच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने १५ लाख रुपये घेतले. त्याला जिल्हा बँके त कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, परवेज यांनी नोकरी मिळणारच असे सांगत त्याला खोटी आश्वासने दिली. एवढेच नव्हे तर, बनावट (Fake) नियुक्तीपत्र देऊन त्याची दिशाभूल केली. बनकर यांनी नऊ वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा परवेज कोकणी यांनी उलट धमकी आणि शिवीगाळ केली, असा दावा फिर्यादीत आहे. कोकणीसह संशयितांनी शंभरपेक्षा अधिक होतकरु व बेरोजगारांकडून नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्याचा आरोप होत असून त्यांसदभनिही तपास सुरु आहे.
संतोष शर्माला कोठडी
उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणारा कथित सामाजिक कार्यकर्ता संतोष शर्मा याला न्यायाधिशांनी शनिवारी (दि. २२) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्यावर दाखल असलेल्या अन्य दोन गंभीर गुन्ह्यांत चुंचाळे पोलीस शर्माचा ताबा घेणार आहेत. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करुन पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत.




