नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आई, तुला त्रास द्यायचा नाहीय, माझा शैक्षणिक (Education) खर्च फार आहे, तु टेंन्शन घेऊ नकोस, तुझी धावपळ होते’, अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून पोलीस अंमलदार महिलेच्या (Woman) वीस वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेने पोलीस दलात (Police Force) खळबळ उडाली आहे.
पूजा दीपक डांबरे (रा., विहंग अपा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे विद्यार्थिनीचे (Girl Student) नाव आहे. पूजा ही बारावी पास झाल्यावर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. त्यातच वडिल विभक्त असल्याने कुटुंबात दोघी मायलेकी राहत होत्या. दरम्यान, संवेदनशील पूजाने कौटुंबिक स्थितीनुरुप जुळते घेतले. खचलेली असतानाच ती तणावात होती.
आई (Mother) पोलीस अंमलदार असल्याने तिला व आईला कौटुंबिक व नैतिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत होत्या, पूजा ही आईवर जीवापाड प्रेम करत होती. मात्र, पूजाने शुक्रवारी (दि. १९) रात्री आठ वाजेपूर्वी घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासून मृत घोषित करण्यात आले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgon Police Station) करण्यात आली आहे.
तपासाधिकाऱ्याची असंवेदनशीलता
या संबंधी अनेक माध्यमांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तपासाधिकारी व आडगाव पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन घेतले नाहीत. संपर्क झाला असता त्यांनी त्रोटक माहिती सांगून ‘थोडावेळाने माहिती देतो’ असे म्हणत असंवेदनशीलतेचा कळस गाठला.




