Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik Crime : विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; नर्सिंगचा प्राचार्य अटकेत

Nashik Crime : विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; नर्सिंगचा प्राचार्य अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यानेच (Collage Principal) चार अल्पवयीन पीडित विद्यार्थिनींशी (Female Student) अंगलट करून लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. द्वारका सर्कल येथील गणपतराव आडके इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सतरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला.

- Advertisement -

छळ असह्य होत असल्याने चारही विद्यार्थिनींनी पालकांच्या मदतीने भद्रकाली पोलीस ठाणे (Bhadrakali Police Station) गाठून संशयित प्राचार्य डॉ. प्रवीण रमेश घोलप (४०, रा. पोलीस लाईनरोड, पाथर्डी शिवार, नाशिक) याच्याविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळ व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) व अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार फिर्याद नोंदवल्या आहेत. त्यानुसार त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

दरम्यान, प्राचार्य डॉ. घोलपविरोधात आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्या पीडितांचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ झाला आहे त्यांनी नाशिक शहर पोलिसांशी (Nashik City Police) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, घोलप याला चारही स्वतंत्र गुन्ह्यांत अटक होणार आहे.

ताज्या बातम्या

Tribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट...

0
नाशिक | Nashik आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी मंत्र्यांसह मुख्य सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...