Monday, April 7, 2025
Homeक्राईमNashik Crime : कोडवर्डनुसार 'वसुली'ची नोंद; अवैध सावकारांच्या अडचणी वाढणार

Nashik Crime : कोडवर्डनुसार ‘वसुली’ची नोंद; अवैध सावकारांच्या अडचणी वाढणार

कर्जदारांचे जबाब नोंदवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) पांढरपेशा व्यवसायाच्या माध्यमातून टक्केवारीने अवैध सावकारी चालविणारे संशयित काही राजकीय नेते व सत्ताधारी आमदारांचे (MLA) निकटवर्तीय असल्याचे उघड झाले, आता या संशयितांच्या (Suspected) अडचणीत वाढ झाली असून शहर पोलीस आयुक्तालय व सहकार उपनिबंधक कार्यालयाने शनिवारी (दि. ५) सकाळी १४ ठिकाणी अचानक राबविलेल्या सावकारांवरील धाडसत्रानंतर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. विशिष्ट कोडवर्ड वापरुन संशयित वसुलीबाज व्याजाच्या पैशांची देवाणघेवाण आणि वसुली करत होते, असे उघड झाले आहे. आठपैकी काही संशयितांकडे सापडलेल्या डाय-यांमध्ये सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच शहरात ‘सावकारी पाश’ खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा पुनश्चः पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) दिला आहे. शहरात फोफावलेल्या अवैध सावकारी आणि नागरिकांचा शारीरिक, आर्थिक व मानसिक छळ रोखण्यासाठी आयुक्तालयाने कठोर भूमिका घेऊन शनिवारी (दि. ५) दिवसभर १४ ठिकाणी छापेमारी करून आठ संशयितांविरुद्ध सबळ पुराव्यांसह गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवकांसह विद्यमान आमदारांच्या निकटवर्तीय व काही नातलगांचा सहभाग आहे. त्यात माजी नगरसेवक विनायक उर्फ नैय्या खैरेसह राजेंद्र जाधव, कैलास मेंद, धनू लोखंडे, गोकुळ धाडा, सुनील पिंपळे, प्रकाश अहिरे व संजय शिंदे या संशयितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरातील वैभव देवरे टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई केल्यानंतर भाजप पदाधिकारी रोहित कुंडलवालचे कारनामे समोर येत आहेत. त्याच्याविरुद्धही पाच गुन्हे नोंद असून, पोलिसांनी (Police) कसून तपासासह कठोर कारवाईसाठी दोषारोपपत्र तयार करण्यास सुरुवात केली आहे. वरील प्रकरणांमुळे पीडित तसेच नागरिकांनी अनेक अवैध सावकारांच्या जाचासंदर्भात आयुक्तालयाची पायरी चढून तक्रारी केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Commissioner Sandeep Karnik) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार कारवाईस सुरुवात झाली आहे.

अटकही होणार

संशयितांबर आठ गुन्हे नोंद करन त्यांच्या अटकेची तजबीज करण्यात आली आहे. यात माजी नगरसेवकासह दोन सत्तारुढ आमदारांच्या काही आप्तेष्टांचाही समावेश आहे. त्यामुळे अवैध सावकारीत पुनश्चः पांढरपेशा संशयितांसह राजकारणी, काही सराईत गुन्हेगारांचा समावेश उघड झाल्याने शहर पोलिसांनी अवैध सावकारीविरुद्ध अशारितीने केलेल्या या धडक कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. यातील काही संशयितांना कायदेशीर कार्यवाहीनुसार लवकरच अटक केली जाणार आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानुसार कर्ज घेतलेल्यांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

डीडीआरपेक्षा मोठी कारवाई पोलिसांची!

अचानक राबविलेल्या या छापासत्रात जे पुरावे, कागदपत्रे दिसले, त्यावरून पोलिसांनी सहकार खात्यापेक्षा सावकारी नियंत्रण कायद्याचा पुरेपूर वापर करून या पांढरपेशा सराईतांवर गुन्हे नोंद केले. त्यामुळे या खासगी वसुलीबाजांचे ‘लाईट’ आता डीम झाले असून काहींनी अटकपूर्वसाठी धावाधाव केल्याचे समजते.

शहरात या गंभीर स्वरुपाची गुन्हेगारी खपवून घेणार नाही. अवैध सावकारी व जाचाविरुद्ध कठोर कारवाईची सूचना सर्व पोलीस ठाणे व पथकांना दिली आहे. नागरिकांनी तक्रार अर्ज प्रत्यक्ष पोलीस आयुक्तालयात सादर करावा. संबंधित अर्जानुसार संशयितांवर त्वरित काखाई करण्यात येईल. तथ्य आढळल्यास गुन्हे नोंद करु.

  • संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

मुद्दे

  • अवैध सावकारांनी शहरासह जिल्ह्यात दिले कर्ज
  • कर्जदारांमध्ये डॉक्टर, व्यावसायिकांचाही समावेश
  • साठेखत, कब्जा पावती, स्टॅम्प पेपरवरून नागरिकांची लूटमार
  • पोलीस आयुक्तालयाच्या व्हाट्सॲप हेल्पलाइनवर करता येईल तक्रार
  • ९९२३३२३३११ या व्हाट्सॲप क्रमांकावर मेसेजद्वारे तक्रार शक्य
  • संशयित नैय्या खैरे माजी नगरसेवक व ठाकरे गटाचे पदाधिकारी
  • नैय्या खैरे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती
  • संजय शिंदे पंचवटीतील कुख्यात सावकार
  • संशयित कैलास मैंद हा विद्यमान आमदारांचा निकटवर्तीय
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Deenanath Mangeshkar Hospital: “त्यादिवशी राहू-केतू काय डोक्यात आला, १० लाख डिपॉझिट...

0
पुणे | Puneपुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी १० लाख रूपये रक्कम आगाऊ मागितले. मात्र, तीन लाख रूपये देतो, असे सांगूनही तनिषा भिसे, या...