Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : अपत्यांच्या पोषणासाठी एमडी तस्करी; मालेगाव, लासलगावात मेफेड्रोनची विक्री

Nashik Crime : अपत्यांच्या पोषणासाठी एमडी तस्करी; मालेगाव, लासलगावात मेफेड्रोनची विक्री

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कपडे विक्रीच्या दुकानासह व्यवसायात तोटा झाल्याने कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी मालेगावातील (Malegaon) दाम्पत्याने (मेफेड्रोन) एमडी ड्रग्ज (MD Drugs) विक्रीच्या धंद्यात एन्ट्री केल्याचे समोर आले आहे. तोटा भरुन काढण्यासह कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काय करावे, या विवंचनेत असतानाच, पैसे कमविण्यासाठी दोघांना लासलगावातून मानवी सोर्स उपलब्ध झाले. त्याचाच फायदा घेत दोघांनी एक-दीड ग्रॅम एमडीची पाकिटे (पुड्या) तयार करून हजार ते दोन हजार रुपये दराने विंचूर, सटाणा, बागलाण, लासलगाव, कळवण व मालेगावात विक्री सुरु ठेवली होती.

- Advertisement -

नाशिक शहर एनडीपीएस (Nashik City NDPS) अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (दि. १) नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळ सापळा रचून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मालेगावातील कमालपुरा येथील अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबु (वय ४५) व त्याची पत्नी शबाना (क्य ४०) यांना तीन लाख साठ हजारांच्या ७१ ग्रॅम ड्रजसह अटक केली होती. आता त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु असून मुंबईतील मीरारोड येथून अन्सारी दाम्पत्याने ओळखीच्या माध्यमातून हे मेफेड्रोन खरेदी केले. ते मुंबई नाशिकरोड असा रेल्वे प्रवास करून खासगी वाहन किंवा एसटी बसने आग्रा रोडने (Aagra Road) मालेगावात नेण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांना पकडण्यात आले होते.

दरम्यान, त्यांनी गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज डिलिंग व विक्रीच्या धंद्यात पाऊल टाकले होते. मालेगावातून या ड्रग्जची दीड ते दोन हजार रुपये प्रतिग्रॅमने विक्री केली. ही विक्री मालेगावसह लासलगाव, विचूर, सटाणा व अन्य तालुक्यांत कशी व कोणाच्या मार्फतीने केली. याशिवाय त्यांचे मालेगाव आणि विंचूर येथील साथीदार पेडलर कोण आहेत, याचा तपास सुरु करण्यात आला असून अन्सारींना ड्रग्जसाखळी कशी चालवायची याची कल्पना देणारा मार्गदर्शक डिलर विंचूर भागातील असल्याचे निष्पन्न होत आहे. विशेष म्हणजे संशयित अन्सारी दाम्पत्यास एकूण आठ अपत्ये असून शबाना ही अब्दुलची दूसरी पत्नी आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन पाल्ये, तर दुसन्या पत्नीपासून दोन पाल्ये आहेत. शबाना हिला पहिल्या पतीपासून दोन पाल्ये असून, या सात पाल्यांना अन्सारी कुटुंबीय सांभाळतात. त्याचे एक पाल्य मृत झाल्याचे कळते. या मुलांच्या (Children) सांभाळासाठी उपजिविकेचे साधन म्हणून त्यांनी ड्रग्ज विक्रीचा बाम मार्ग निवडल्याचे कळते.

ग्रामीणलाही विळखा

नाशिक शहराला एमडी ड्रग्ज तस्करी व विक्रीचा विळखा बसल्याचे आतापर्यंतच्या ड्रब्रज जप्ती व संशयितांच्या (Suspected) अटकेतून उघड झाले आहे. विशेष म्हणजे या एकूणच साखळीत उच शिक्षित संशयितांसह काही तरुणी व महिलांचाही सहभाग उघड झाला आहे. नाशिकमध्ये करण्यात आलेल्या पाच कारवायांत आतापर्यंत आठ महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या असून शहरातील क्रूज कार्टेल आता नाशिक ग्रामीणमध्ये वळत चालले आहे. हा विळखा अनेक तालुक्यांसह गावागावांत पसरत चालल्याचे अन्सारींच्या अटकेनंतर उघड झाले आहे.

कारवाईस जोर

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एनडीपीएस पथकास अमली पदार्थविरोधी कारवाया वाढवून पेडलरला पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यान्वये पोलीस उपायुक्त प्रशांत, बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनडीपीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या निर्देशनात सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देव किसन गायकर आदींचे पथक कार्यरत असून ते विविध गुन्ह्यीतील संशयित, पूर्वोइतिहास असलेल्या सराईतांवर लक्ष ठेऊन आहेत, ड्रग्जमुक्तीसाठी या स्वरुपाच्या कारवाया अजूनही व्यापक स्वरुपात राबविल्या जाणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...