Monday, May 19, 2025
HomeनाशिकNashik Crime : कैद्यांसोबत पोलिसांची हॉटेलमध्ये 'पार्टी'; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छापा, चौघांची चौकशी...

Nashik Crime : कैद्यांसोबत पोलिसांची हॉटेलमध्ये ‘पार्टी’; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छापा, चौघांची चौकशी सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

कारागृहातील (Jail) न्यायालयात (Court) बंदीवानांना सुनावणीला हजर करण्यासाठी नेमलेल्या पोलीस पथकातील चार अंमलदारांनी खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांसोबत हॉटेलात मटणावर ताव मारत मैफिल रंगवल्याचा प्रकार उघड झाला आहे. सहाय्यक आयुक्तांसह निरीक्षकांनी टाकलेल्या छाप्यामुळे प्रकाराची वाच्यता झाली आहे. सराईत संशयितांना कारागृहातून न्यायालयात व न्यायालयातून कारागृहात नेण्याची जबाबदारी असणाऱ्या पथकातील कैदीपार्टीने न्यायालयातून निघाल्यावर कर्तव्य बाजूला ठेवत हॉटेलमध्ये हा उद्योग केला. आता संशयित पोलिसांसह या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित पोलिसांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

शहर पोलीस मुख्यालयात (City Police Headquarters) नेमणुकीस असलेल्या पोलिसांना कारागृहातून संशयितांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेमले जाते. या पथकाला ‘कैदी पार्टी’ असे म्हटले जाते. उपनगर व अंबड पोलीस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या खुनांच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना सुनावणीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संशयितांना (Suspected) कारागृहात नेण्याऐवजी अंमलदारांनी अर्थात नियुक्त कैदीपार्टीने त्यांच्यासोबत उपनगर हद्दीत एका हॉटेलात ‘बैठक’ रंगवली. एका नागरिकाने यासंदर्भात थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कळवल्यानंतर अंबडचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांनी छापा मारुन ४ पोलीस अंमलदारांसह संशयितांना ताब्यात घेतले.

दरम्यान, अंमलदारांना चौकशीकरता कार्यालयात नेऊन संशयित कैद्यांना कारागृहात पाठवण्यात आले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या चौकशीनंतर रविवारी (दि. १८) सकाळपासून पोलीस (Police) दलात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) गंभीर दखल घेतली असून, उद्या सोमवारी (दि. १९) कारवाईसह चौकशीचा संपूर्ण अहवाल सादर होणार आहे.

प्रकरण काय?

नाशिकरोडमध्ये सन २०२४ मध्ये दाखल एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित प्रफुल्ल विजय पाटील (वय २१) व उपनगर पोलीस ठाण्यात सन २०२४ मध्ये दाखल एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कुंदन गाढे या दोघांना न्यायालयात सुनावणीसाठी शनिवारी हजर करण्यात आले. त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस मुख्यालयातून अंमलदार दीपक रवींद्र जठार, विकी रवींद्र चव्हाण, गोरख पोपट गवळी यांच्यासह एकाला नेमण्यात आले होते. न्यायालयातून निघाल्यानंतर संशयितांपैकी एकाचे नातलग पोलिसांजवळ आले. त्यांनी संशयितांना डबा दिल्याचे समजते. त्यानंतर संशयितांच्या मर्जीतून पोलीस उपनगर भागातील एका हॉटेलात गेले. तेथे मटणावर ताव मारत त्यांनी ‘पार्टी’ रंगवली.

चोरीछुपी ‘अर्थकारण’

पोलीस मुख्यालयातून ठराविक अंमलदारांनाच कैदी पार्टी साठी नेमण्यात येते. वारंवार संबंधित कर्तव्यावर नेमण्यासाठी तेथील हजेरीमास्तरांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अंमलदारांमार्फत ङ्गमलईफदेण्यात येते. कारण, जितका ङ्गत्ताक दवान फसंशयित असेल तितकाच फायदा ङ्गकैदी पार्टीफदरम्यान होतो, अशी पोलीस दलात चर्चा आहे. न्यायालयातून निघतांना संशयितांना नातलगांसोबत भेटू देणे, घरचा डबा व इतर वस्तू देणे, न्यायालयीन प्रक्रिया लवकर संपूनही सायंकाळी कारागृहात कैद्यांना हजर करणे, बाहेर हॉटेलात जेवण करु देणे यासाठी कैद्यांसह त्यांच्या नातलगांमार्फत ङ्गमेवाफदिला जातो, असे कळते. हाच ङ्गमेवाफसंबंधित कर्तव्यावर नेमणूक करून घेण्यासाठी हजेरी मास्तस्सह संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. दीड महिन्यापूर्वी आयुक्तांनी मुख्यालयातील हजेरी मास्तरसह वरिष्ठ निरीक्षकांना ‘दणका’ दिला होता. मात्र, आता ङ्गकैदी पार्टीफ्या झोल उघड झाल्याने कठोर कारवाईची शक्यता आहे.

कैदी रुग्णांची झाडाझडती?

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ङ्गप्रिझन वॉर्डपमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदारही रडारवर येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या कैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातलगांपासून ‘माई-दादा’ यांना खूश ठेवण्याचे काम ‘प्रिझन वॉर्ड’ च्या अंमलदारांमार्फत होत असल्याची ओरड आहे. वारंवार काही बंदिवान, संशयित उपचारार्थ दाखल होत आहेत. त्यात कारागृह प्रशासन, रुग्णालय प्रशासनापासून तेथे नेमणुकीस असलेल्या पोलिसांपर्यंतची ‘सेटिंग्ज’ असल्याची चर्चा आहे. वरील पथकच नव्हे तर मुख्यालयातील इतर अंमलदारही संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : पेठ उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव मंजूर

0
पेठ | प्रतिनिधी | Peth पेठ नगरपंचायतीच्या (Peth Nagarpanchyat) उपनगराध्यक्षा अफरोजा शेख यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव (No Confidence Motion) मंजूर झाल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले...