Sunday, May 18, 2025
Homeक्रीडाNashik Crime : मोक्कान्वये सात वर्षांचा कारावास; एटीएम फोडून दरोडा

Nashik Crime : मोक्कान्वये सात वर्षांचा कारावास; एटीएम फोडून दरोडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सातपूर हद्दीतील (Satpur Area) आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) एटीएम फोडून दरोडा घालणाऱ्या टोळीविरोधात मोक्काअन्वये (Mocca) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांनी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा (Prison) आणि प्रत्येकी ३ लाख १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती.

मिलनसिंग रामसिंग भादा (४३), गजानन उर्फ भोंद्या मोतीराम कोळी (२७), किस्मतसिंग रामसिंग भादा (३५, तिघे रा. मोहाडी, धुळे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सातपूर पोलिसात दाखल गुन्ह्यांनुसार, २९ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास तिघा आरोपींसह तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०), रामसिंग राजूसिंग जुन्नी उर्फ रामसिंग धनासिंग भोंड (२५, रा. गंजमाळ), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५, रा. मोहाडी, धुळे) यांच्या टोळीने सातपूर हद्दीतील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम (ATM) कटावणीने फोडले.

एटीएममधील लोखंडी कॅशबॉक्स टायर रोपच्या सहाय्याने एटीएमच्या बाहेर काढून बोलेरोमध्ये ठेवत होते. त्याचवेळी फिर्यादी व साक्षीदार त्याठिकाणी आले असता, आरोपींनी (Accused) एटीएम मशीन जागेवर सोडून बोलेरोतून पळ काढताना दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातपूर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपींविरोधत मोक्कान्वये कारवाई करुन तिघांना अटक केली.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त अनिरुद्ध अढाव यांनी करुन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. बी.व्ही. वाघ यांनी तीनही आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने त्यांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ३ लाख १ हजारांचा दंड ठोठावला, असा एकूण ९ लाख ९ हजारांचा दंड केला.

दरम्यान, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल, ॲड. रेश्मा जाधव, अॅड. शैलेश सोनवणे यांनी कामकाज (Work) पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार श्यामराव सोनवणे, महिला हवालदार राजश्री बोंबले यांनी पाठपुरावा केला.

मिलनसिंगविरूध्द गंभीर गुन्हे

मिलनसिंगविरूध्द १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गजाननविरूध्द ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ते सराईत असून संघटितपणे दरोडे, हाणामाऱ्या, जबरी लुटीसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या