Sunday, January 18, 2026
HomeनाशिकNashik Crime : शिंदे सेनेच्या उमेदवाराचा 'विजयी' उन्माद; पराभूत उमेदवाराच्या बंगल्यात फेकले...

Nashik Crime : शिंदे सेनेच्या उमेदवाराचा ‘विजयी’ उन्माद; पराभूत उमेदवाराच्या बंगल्यात फेकले फटाके

पार्किंगमध्ये आगडोंब

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) निकालानंतर उपनगरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विजयी मिरवणुकीवरून गंभीर स्वरुपाचा राजकीय संघर्ष उफाळून आला. शिवसेना शिंदे गटाच्या गट ‘क’ मधील उमेदवार पूजा प्रविण नवले विजयी होताच त्यांचे पती संशयित प्रविण यांनी भाजपच्या (BJP) पराभूत उमेदवार पुष्पा (अनिता) अनिल ताजनपुरे यांच्या आनंदनगरातील घरासमोरून बेकायदेशीरपणे ‘विजयी’ मिरवणूक काढत थेट बंगल्यात ज्वलनशील पदार्थ व फटाके फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ताजनपुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, निवडणुकीनंतरचा राजकीय वाद आता कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवार (दि.१६) रोजी जाहीर होताच प्रभाग १६ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) शेकडो कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहा वाजता डीजेच्या दणदणाटात विजयोत्सव साजरा केला. मात्र हा जल्लोष मर्यादा ओलांडून थेट विरोधकांच्या घरापर्यंत पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपच्या उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांच्या फिर्यादीनुसार संशयित नवले दाम्पत्य व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर आले. घोषणा देत, फटाके वाजवत मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी काही संशयितांनी जाणीवपूर्वक ज्वलनशील पदार्थ, सुतळी बॉम्ब, फटाके घराच्या दिशेने फेकले. या प्रकारामुळे ताजनपुरे कुटुंबीय भयभीत झाले. हा केवळ विजयोत्सव नसून राजकीय सूडबुद्धीने व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप ताजनपुरे यांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यासह साथीदारांवर दरोडा, खंडणीचे गुन्हे

दरम्यान, जमावातील प्रविण अर्जुन नवले व त्यांचे साथीदारांनी फटाके व ज्वलनशील पदार्थ पेटवून बंगल्याच्या आवारात फेकले. त्यामुळे पार्किंगमध्ये आग लागली. आवाज व धुरामुळे पुष्पा यांच्यासह अपूर्वा ताजनपुरे व जागृती मांडे बाहेरील गेटजवळ आले. हिंसक जमावाने महिलांना पाहून घोषणाबाजी करत अश्लिल शब्द उच्चारले. यांना ‘जाळून संपवून टाका’, अशी चिथावणी प्रविण यांनी दिल्याने विजयी उमेदवार पूजा नवले आणि इतरांनी धमकी देत काही संशयितांनी पुष्पा यांच्या पोटावर लाथ मारली. त्या विव्हळत असतानाही त्यांना मारहाण करण्यात आली. त्याचक्षणी संशयितांनी त्यांच्या गळ्यातील अडीच लाखांचे पाच तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावले. दरम्यान, हा राडा पाहून पुष्पा यांचे पुतणे दीपक व अश्विन ताजनपुरे पळत आले. त्यानंतर जमाव पसार झाला. या घटनेने भेदरलेल्या ताजनपुरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही (Election Result) राजकीय वैमनस्य टोकाला जाऊ शकते, याचे वास्तव समोर आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”

मूल्यांना तडा!

या घटनेनंतर, शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले असून, निवडणुकीतील स्पर्धा निकालानंतर संपते; मात्र लोकशाहीत पराभूत उमेदवारांबाबत आदर ठेवण्याची परंपरा मोडीत काढली जात आहे. उपनगरमधील हा प्रकार लोकशाही मूल्यांना तडा देणारा ठरला असून सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात आहेत. नगरसेविका पूजा यांचे पती प्रविण अर्जुन नवले यांच्यासह काही समर्थकांना अटक होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे

  • या प्रकरणाचा व्हिडिओ, सीसीटीव्ही व्हायरल
  • बहुतांश ठिकाणी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर फटाके फोडले
  • अनेक उमेदवारांनी पहिलवान पोज देऊन मस्ती दाखविली
  • निकाल जाहीर होताच समर्थकांनी अनेक पराभूतांचे घरे लक्ष्य केले
  • निष्काळजीपणे सुतळी बॉम्ब फोडत गुलाल उधळला
  • असे प्रकार झाल्यास तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन

ताज्या बातम्या

IndiGo Bomb Threat : इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; लखनौमध्ये विमानाचं...

0
दिल्ली । Delhi दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या पत्रामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने...